पुणे कार अपघातात रोजच नवनवीन खुलासे होत (Pune accident) आहेत. आताही या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गाडीत जबरदस्तीने बसवून ज्या कारचालकाला नेण्यात आलं ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. याच गाडीत मला जबरदस्तीने बसवून घेऊन गेले होत असा आरोप कारचालकाने विशाल अग्रवालवर केला होता. ही मर्सडीज कंपनीची कार आता येरवडा पोलीस स्टेशनमध्ये उभी करण्यात आली आहे.
पुण्यातील अपघातानंतर कार चालकाला धमकी देऊन जबाब देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला. याआधी आजोबा सुरेंद्र अग्रवालची चौकशी झाली होती. या चौकशीत अल्पवयीन मुलाला चावी दिल्याची कबुली त्यांनी दिली होती. नातू अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली होती.
पुणे अपघात प्रकरणातील ‘SIT’च्या अध्यक्षांवरच खंडीभर आरोप
कल्याणीनगर अपघात प्रकरणात चालकाला धमकावणे आणि डांबून ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपची आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी अग्रवाल यांच्या बाजूने वकिलांना जोरदार युक्तीवाद केला. तसेच पुण्यात अपघात झाला त्यावेळी मी दिल्लीत होतो असे सुरेंद्र अग्रवाल यांना सांगितले, तसेच मी दिल्लीत असतानाच पोलीस घरातला डीव्हिआर घेऊन गेले. मात्र, घरातल्या सीसीटीव्हीसोबत छेडछाड झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणी विशाल अग्रवाल याची पोलिसांना कोठडी मिळालीयं.
दरम्यान, या प्रकरणात कारचालकानेही अग्रवाल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका गाडीत मला जबरदस्तीने बसवून घेऊन गेले होत असा आरोप कारचालकाने विशाल अग्रवालवर केला होता. ती कार कोणती होती असा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांनी यासाठी शोधमोहिम राबवली. त्यानंतर ही कार मिळून आली. मर्सिडीज कंपनीची अतिशय आलिशान कार आहे. आता ही कार पोलिसांनी जप्त केली असून येरवडा पोलीस ठाण्यात उभी करण्यात आली आहे.