19.7 C
New York

Ajit Pawar : निवडणूक संपताच अजितदादांना झटका

Published:

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्याच्या (Jarandeshwar Sugar Factory) घोटाळ्याप्रकरणी अजितदादांना दिलासा मिळाला होता. या प्रकरणातून अजितदादांचं नाव वगळण्यात आलं होतं. मात्र, आता लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपताच सरकारकडून पुन्हा जरंडेश्वर साखर कारखान्याची चौकशी सुरु करण्यात आलीयं. लाचलुचपत विभागाकडून (ACB) ही चौकशी सुरु करण्यात आली असून ही चौकशी म्हणजे अजित पवार यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

राज्यात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यापर्यंत अजित पवार महायुतीच्या प्रचारात दिसून येत होते. मात्र, त्यानंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारात दिसून आलेले नाहीत. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांमध्ये आलबेल नसल्याचं पाहायला मिळालं होतं. अशातच आता निवडणूक संपल्यानंतर लगेचच जरंडेश्वर साखर कारखान्यातील कथित गैरव्यवहार आणि कोरेगाव भूखंड डीस्टलरी प्रकल्पाबाबत चौकशी सुरु करण्यात आलीयं.

…म्हणून आम्हीच वर्धापन दिन साजरा करणार – उमेश पाटील

Ajit Pawar नेमकं प्रकरण काय?

सातरा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना तत्कालीन आमदार शालिनीताई पाटील चालवत होत्या. मात्र, हा साखर कारखाना कर्जात बुडत चालला होता. या कारखान्यासाठी अतोनात प्रयत्न करण्यात आले मात्र, अखेरीस हा कारखाना लिलावाच्या प्रक्रिया अजित पवार यांच्या संबधित व्यक्तीने चालवण्यास घेतला. गुरु कमोडिटी नामक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा कारखाना लिलाव प्रक्रियेत खरेदी केला होता.

जरंडेश्वर कारखान्याची लिलावाची प्रक्रिया बोगस असल्याचा आरोप करत शालिनीताई पाटील यांनी न्यायालयाचे दार ठोठावले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरच या प्रकरणाची ईडीकडून चौकशी करण्यात आली.दरम्यान, भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांचं नाव जरंडेश्वर कारखाना प्रकरणातून वगळण्यात आलं होतं. त्यावेळी अजितदादांना एक दिलासा मिळाला खरा पण आता पुन्हा एकदा एसीबीकडून चौकशी सुरु होत असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीयं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img