पुणे कार अपघात पुणे अपघात (Pune accident) प्रकरणाला रोज नवे धुमारे फुटत आहेत. तपास जसा पुढे जाईल किंवा त्यामध्ये कोणताही निर्णय झाला की लगेच भ्रष्टाचाराचा नवा अध्याय समोर येतोय. नुकतंच यामधील (Sassoon) ससून रुग्णालयाचं कनेक्शन समोर आलं. येथील डॉक्टरांनी अपघातातील कार चालक आरोपीच्या (Blood Sample) ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याचं समोर आलं आहे. त्यामध्ये डॉक्टरांसह ससूनमधील शिपायालाही अटक झाली आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चोकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. मात्र, अध्यक्षस्थानी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती केल्याने आता नवा वाद सुरू झाला आहे. एसआयची समितीच्या अध्यक्षावरच भ्रष्टाचाराचा आरोप असल्याचं समोर आलं आहे.
पाण्यासाठी वणवण; भाजप मंत्री म्हणतात…
Pune accident निवडीवर प्रश्नचिन्ह
एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे आहेत. तर, डॉ. गजानन चव्हाण आणि डॉ. सुधीर चौधरी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, या SIT समितीच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावर आधीच भ्रष्टाचाराचा आरोप आहे. त्यामुळे एसआयटी समितीच्या निवडीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. सापळे या ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे. जे हॉस्पिटल रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत. त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांचे आरोप आहेत.
Pune accident बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन
त्यावेळी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. आता जेजे रुग्णालयात अनेक प्रकरणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केल्याचाही त्यांच्यावर आरोप आहेत. तसा थेट आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांनीही केला होता. जेजे रुग्णालयात औषध, यंत्रसामग्री खरेदीच्या बिलांवर 5 ते 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सह्या करत नाहीत, असा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. हा मुद्दा विधानसभेतही चांगलाच गाजला होता.