मुंबई
पुण्याच्या आरोपीला (Pune Accident) वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांनी ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केली आहे. याबाबत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी संताप व्यक्त केला असून पुण्यातील (Pune) ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा असा परखड सवाल उपस्थित केला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी वेदांतच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. यानंतर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलिसांपासून रुग्णालयापर्यंत अशा सगळ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करताना म्हटले की, पुण्यातील ससून रुग्णालय हे रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा? असा परखड सवाल उपस्थित केला आहे. त्यांनी म्हटले की, आधी ललित पाटीलचे धंदे याच रुग्णालयातून सुरू होते. ललित पाटीलचे अवैध धंदे सरकारमधील कोणत्या मंत्र्याच्या आशीर्वादाने सुरू होते, हे महाराष्ट्राला माहिती आहे. आता पुण्याच्या आरोपीला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केली. हे रुग्णालय गुंड आरोपी यांच्यासाठी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे
ललित पाटील प्रकरणापासून या हॉस्पिटलच्या कारभारावर आधीच शंका होती पण सरकार आणि रुग्णालय प्रशासनाने या शंकेवर शिक्कमोर्तब केले. पुणे ‘हिट अँड रन’ प्रकरणात पूर्ण व्यवस्थेने आरोपीला मदत केली आहे. दारू पिऊन दोन लोकांची हत्या करणाऱ्याला मदत करण्यासाठी किती जणांनी मेहनत घेतली हे समोर येत आहे. या सर्वांना कठोर शिक्षा व्हायला हवी. म्हणून आम्ही न्यायिक चौकशीची मागणी करत आहोत. पोलिसांपासून रुग्णालयापर्यंत अशा सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
नेमकं प्रकरणं काय?
पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलं आहे. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलं आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या तीन पिढ्या आता जेलमध्ये आहेत.