सोलापूर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Thackeray Group) पक्षाचे प्रवक्ते शरद कोळी (Sharad Koli) आणि माजी आमदार रमेश कदम (Ramesh Kadam) यांना न्यायालयाने एक महिन्याची शिक्षा ठोठावली आहे. नऊ वर्षांपूर्वीच्या एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील उड्डाण पुलाखाली जाळी तोडल्या प्रकरणी तसेच पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्या प्रकरणात त्यांच्यावर 2015 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने नऊ वर्ष नंतर आज निकाल दिला आहे. या प्रकरणात शरद कोळी आणि माजी आमदार रमेश कदम यांच्या 72 जणांचा समावेश आहे.
या निर्णयाला विरोध करत त्यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील काढला होता. पुढे याच प्रकरणात माजी आमदार रमेश कदम, शरद कोळी यांच्यासह एकूण 72 जणांना आरोपी करण्यात आलं होतं. या प्रकरणी आता न्यायालयाने निर्णय दिला असून रमेश कदम आणि शरद कोळी यांना एका महिन्याचा कारावास आणि 1 हजार रुपयांचा दंड ठोठवला आहे.