26.6 C
New York

Kavya Maran: काव्या मारनच्या डोळ्यातले अश्रू पाहून बिग बींची प्रतिक्रिया…

Published:

रविवार सायंकाळी (२६ मे) रोजी IPL 2024 चा अंतिम सामना झाला. हा सामना कोलकाता नाइट रायडर्स (KKR) आणि सनरायजर्स सनराइजर्स हैदराबाद (SRH) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात शाहरूखच्या KKR टीमने SRH संघावर 8 विकेट्स राखून सहज विजय मिळवला. यंदा KKR संघाने IPLच्या ट्रॉफीवर तिसऱ्यांदा नाव कोरलं आहे. या विजयानंतर कोलकाता संघाच्या शाहरुख आणि त्याचे कुटुंबिय तसेच केकेआरचे चाहते जल्लोष करताना दिसले. शाहरुखने स्टेडिअममध्ये फेरी मारत चाहत्यांचे आभारही मानले. मात्र एकीकडे आनंद सुरू असतानाच हैदराबादचा संघ मात्र पराभवामुळे दु:खात होती.

टीम इंडिया विश्वचषकासाठी रवाना, विराट भारतातच

हैदराबाद संघाची मालक काव्या मारनला (Kavya Maran) अश्रू अनावर झाले होते. याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडचे बिग बी, अर्थात अमिताभ बच्चन यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. काव्याच्या डोळ्यातले अश्रू पाहून बिग बी भारावले. बिग बींनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. एका पोस्टमध्ये अमिताभ यांनी काव्या मारन यांचा उल्लेख केला. “सगळ्यात दु:खद आणि वाईट गोष्ट म्हणजे हैदराबादच्या पराभवानंतर त्या संघाच्या मालकीणीच्या डोळ्यात आलेले अश्रू.. पराभवामुळे इमोशनल होऊन तिचं रडणं. कॅमेऱ्याकडे पाठ करून तिने तिचे अश्रू आणि इमोशन्स लपवले. पण ते पाहून मला तिच्यासाठी खूप वाईच वाटलं !पण काही हरकत नाही, उद्याचा आणखी एक नवा दिवस आहे.. माय डिअर! ‘ असे अमिताभ बच्चन यांनी नमूद केले.

केकेआरच्या विजयानंतर शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय खूपच आनंदात होते. पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान यांनी शाहरुखला मिठी मारली आणि आनंद व्यक्त केला. त्यांचा हा व्हिडीओ सध्यासोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img