23.1 C
New York

SSC Result: राज्यात दहावीचा निकाल जाहीर! कोकण विभागानं मारली बाजी…

Published:

विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील बारावीचा निकाल देखील जाहीर झाला. दहावीच्या निकालाबाबत (SSC Result) सर्वांना हुरहूर लागली आहे. अशातच याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज (27 मे) रोजी दहावीचा निकाल दुपारी १ वाजता जाहीर झाला आहे.

कोकण विभागानं यंदाच्या निकालामध्ये बाजी मारली असून नागपूर विभाग मात्र तळाशी आहे. कोकण विभागानं 99.01 टक्क्यांनी बाजी मारली. तर नागपूर विभाग 94.73 टक्क्यांसह राज्यातील विभागनिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. यंदा पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.21 टक्के तर मुलांचा निकाल 94.56 टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच विभागांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. तर राज्यात दहावीच्या परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांच्या निकालाची एकूण टक्केवारी 94.86 टक्के इतकी आहे.
खालील वेब साईटवर दहावीचा निकाल पाहू शकता.

mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in

विभागनिहाय निकाल (टक्केवारी)

मुंबई : 95.83 टक्के
पुणे : 96.44 टक्के
नागपूर : 94.73 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 95.19 टक्के
अमरावती : 95.58 टक्के
कोल्हापूर : 97.45 टक्के
नाशिक : 95.28 टक्के
लातूर : 95.27 टक्के
कोकण : 99.01 टक्के

यंदा महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. 1 ते 26 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं. दरम्यान, नापास मुलांच्या परीक्षा 16 जुलैला पुन्हा होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी असून ऑगस्टमध्ये निकाल जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले.

आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC/HSC Result) परीक्षा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन केलं जातं. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा (SSC Result) होतात. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा कोकण विभागानं बाजी मारली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img