23.1 C
New York

SSC Result: दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट…

Published:

आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी आणि बारावी बोर्डाच्या (SSC/HSC Result) परीक्षा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं आयोजन केलं जातं. दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा (SSC Result) होतात. 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यंदा कोकण विभागानं बाजी मारली. ‘बारावीचे विद्यार्थी चांगल्या गुणानं उत्तीर्ण झाले त्यांचं अभिनंदन करतो’, असं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले. शालेय शिक्षण मंत्र्यांनी दहावीचा निकाल (Maharashtra SSC Result Date Update) कधी लागणार याबाबत मोठी अपडेट दिली.

दहावीच्या निकालाबाबत मोठी अपडेट…
विद्यार्थ्यांसह पालकांना देखील आता परीक्षांच्या निकालाचे वेध लागले आहेत. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्रातील बारावीचा निकाल देखील जाहीर झाला. दहावीच्या निकालाबाबत सर्वांना हुरहूर लागली आहे. अशातच याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आज (27 मे) रोजी दहावीचा निकाल लागण्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली.
आज दुपारी 1 वाजता दहावाची निकाल जाहीर केला जाईल. तर सकाळी 11 वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे विभागीय टक्केवारी या पत्रकार परिषदेत जाहीर करतील. त्यानंतर दुपारी एक वाजता प्रत्यक्षात विद्यार्थी आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहू शकणार आहेत. खालील वेब साईटवर दहावीचा निकाल पाहू शकता.

mahresult.nic.in
sscresult.mkcl.org
sscresult.mahahsscboard.in

यंदा महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 2023-24 या शैक्षणिक वर्षात वाढली आहे. दहावीला 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांची नोंदणी आहे. 1 ते 26 मार्च दरम्यान दहावीची परीक्षा पार पडली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण नऊ विभागीय मंडळांतर्फे परीक्षेचं आयोजन केलं जातं. दरम्यान, नापास मुलांच्या परीक्षा 16 जुलैला पुन्हा होणार आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आणि श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना अजून एक संधी असून ऑगस्टमध्ये निकाल जाहीर होईल, असं केसरकर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img