21 C
New York

Sagar Karande: सागर कारंडे दिसणार ‘या’ नव्या हिंदी कार्यक्रमात!

Published:

आपल्या अभिनयाने गेल्या दहावर्षांहून अधिक वर्षे प्रेक्षकांना हसवणारा अभिनेता म्हणजे सागर कारंडे (Sagar Karande). झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. नुकताच सागर कारंडेच्या स्किटचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सोनी टेलिव्हिजनवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या शोची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. या शोमध्ये अनेक मराठीसह हिंदी टेलिव्हिजन कलाकारांचा समावेश आहे. ह्यात सागर कारंडेची वर्णी लागली आहे.

शेअर केलेल्या प्रोमोमध्ये आपल्या खास मनोरंजनाच्या स्टाईलमध्ये सागर मनोरंजन करताना दिसत आहे. ह्या स्किटमध्ये सागरसह गौरव दुबे आणि स्नेहिल मेहरा देखील आहेत. हिंदी टिव्हीवरील सागरचा हा पहिलाच प्रोग्राम आहे. त्यामुळे चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कधी स्वारगेट बाई तर कथी पोस्टमनच्या भूमिकेतून सागर कारंडेने मराठमोळ्या प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. आजारपणामुळे सागरने ‘चला हवा येऊ द्या’ ला निरोप दिला होता. अपुरी झोप आणि वेळेवर जेवण नसल्यामुळे सागर आजारी पडला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर मराठीनाटकाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण आता त्यानंतर थेट सागर हिंदी कार्यक्रमात दिसणार असल्यामुळे चाहते कौतुक करीत आहेत.

या शोमध्ये सागरसह कुशल बद्रिके, हेमांगी कवी, गौरव मोरे, अतिशा नाईक हे मराठमोळे सेलिब्रिटी आहेत. त्यामुळे आता सागरला देखील पाहायला मिळणार आहे. आपल्या कॉमेडीच्या जोरावर सागर कारंडेने मराठी टिव्ही इंडस्ट्रीमध्ये प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. तसाच तो आता हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेला आहे. सोनी टेलिव्हिजनच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सागर कारंडेच्या स्किट दरम्यानचा व्हिडीओ शेअर केलेला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img