पुणे
पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर विशाल अग्रवाल (Vishal Agarwal) यांचे अल्पवयीन मुलाच्या गाडीने युवक युतीचा अपघातात (Pune Accident) मृत्यू झाला होता. या प्रकरणात आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलून त्या ठिकाणी दुसरे ब्लड सॅम्पल ठेवण्यात आल्याच्या आरोपात वरून पुण्यातील ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉक्टरांचे निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ससून रुग्णालय चर्चेत आले आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरांनी ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे. ससूनच्या फॉरेन्सिक लॅबचे प्रमुख डॉ.अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हरलोर यांना अटक करण्यात आली आहे.
या दोन्ही डॉक्टरांनी आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याचं समोर आलं आहे. अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन केले होते की नाही, हे तपासण्यासाठी तब्बल 9 तासांच्या दिरंगाईनंतर पोलिसांनी ससून रुग्णालयात त्याची ब्लड टेस्ट केली होती. मात्र, या चाचणीतही मुलगा दोषी आढळू नये, यासाठी ससून रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनीच त्याच्या रक्ताच्या नमुन्याची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे.
नेमकं प्रकरणं काय?
पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलं आहे. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला. पुणे हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल बाप लेकांपाठोपाठ आता आजोबालाही जेलमध्ये डांबण्यात आलं आहे. ड्रायव्हरला डांबून ठेवून त्याला धमकावल्याप्रकरणी आजोबा सुरेंद्र अग्रवालला पुणे पोलिसांनी अटक केली. त्याला 28 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दारुच्या नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन आरोपाली सध्या बाल सुधारगृहात ठेवण्यात आलंय. त्याचे वडील विशाल अग्रवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तर आजोबा सुरेंद्रला आज पोलीस कोठडीत डांबण्यात आलं. त्यामुळे अग्रवाल कुटुंबियांच्या तीन पिढ्या आता जेलमध्ये आहेत.