‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ २०२४ (Cannes Film Festival 2024) भारतीय सिनेसृष्टीसाठी राहिला आहे. ७७ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जवळपास ४८ वर्षांनंतर श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ला स्पेशल स्क्रिनिंग मिळालं. या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार, एन्फ्लूएन्सर व उद्योजक उपस्थित होते. अनेक श्रेणींमध्ये भारतीय चित्रपट आणि कलाकारांना नामांकन मिळालं होतं. भारतीय चित्रपट निर्मात्या पायल कपाडिया (Payal Kapadia) यांना देखील यंदाच्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ २०२४ मध्ये पुरस्कार मिळाला आहे. ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी ग्रँड प्रिक्स जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती म्हणून इतिहास रचला आहे. ७७ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’च्या समारोप समारंभात या चित्रपटाला पाल्मे डी’ओर नंतर फेस्टिव्हलचे दुसरे-सर्वात प्रतिष्ठित पारितोषिक मिळाले.
सध्या सोशल मीडियावर पायल यांचं कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या विजयाबद्दल फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने त्यांचे अभिनंदन केले आहे आणि लिहिले आहे, “FTII साठी हा अभिमानाचा क्षण आहे कारण माजी विद्यार्थ्यांनी कान्स येथे इतिहास रचला आहे. आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एका अभूतपूर्व वर्षाचे साक्षीदार आहोत. 77 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल, FTII सिनेमाच्या या मेगा इंटरनॅशनल स्टेजवर आपल्या माजी विद्यार्थ्यांच्या गौरवशाली कामगिरीची कदर करते.”
कान्स पुरस्कार जिंकणारी ‘ही’ पहिली अभिनेत्री कोण?
भाजप सदस्य गजेंद्र चौहान यांना २०१५ मध्ये पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नियुक्त केल्याबद्दल पायल यांनी निषेध केला होता. जवळपास जून ते ऑक्टोबर 2015 पर्यंत 139 दिवस पायल यांनी निषेध केला.
पंतप्रधान मोदींनी केले कौतुक
पायल यांच्या कामगिरीवर भारताने प्रेमाचा वर्षाव केला. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायलच्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि लिहिले, “पायल कपाडियाने तिच्या कामासाठी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँड प्रिक्स जिंकण्याच्या ऐतिहासिक कामगिरीबद्दल भारताला अभिमान आहे. आम्ही इमॅजिन एज लाइट’, FTII ची माजी विद्यार्थी, अशी तिची उल्लेखनीय प्रतिभा जागतिक स्तरावर चमकत आहे. पायल भारतातील समृद्ध सर्जनशीलतेची झलक.” दरम्यान, पायलने तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणासाठी ग्रँड प्रिक्स पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती म्हणून इतिहास रचला आहे. भारतातील एका महिलेने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट ज्याला कान्स मध्ये पुरस्कार मिळला आहे.