26.6 C
New York

Monsoon Update : या आठवड्यातच मान्सून केरळमध्ये दाखल होणार

Published:

मुंबई : मान्सूनबाबत (Monsoon Update) हवामान विभागाने एक खुशखबर दिली आहे. येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात मान्सून अंदमान-निकोबारमध्ये दाखल झाला. त्याची वाटचाल योग्य गतीने सुरु असताना बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले. त्यामुळे मान्सूनच्या प्रगतीवर परिणाम होईल कि काय, अशी भीती होती. मात्र, चक्रीवादळ बांगला देशाच्या दिशेने सरकल्याने मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने आणि गतीने सुरु आहे. यात कोणताही अडथळा न आल्यास येत्या पाच दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. शुक्रवारी ३१ मेपर्यंत नैऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Monsoon Update : पुढील आठवड्यात तळकोकणात

केरळमध्ये मान्सूनच्या प्रगतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. 19 मे रोजी मान्सूनचं अंदमानात आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं याआधीच दिली आहे. मान्सूनने बंगालच्या उपसागरासह मालदीव, कोमोरिनचा भाग, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र व्यापला आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर साधारणपणे पाच दिवसात मान्सून तळकोकणात दाखल होतो. आणि मुंबईपर्यंत पोहोचायला त्याला त्यानंतर पाच ते सहा दिवस लागतात. या अर्थाने मान्सून मुंबईत 10 ते 11 जून दरम्यान दाखल होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : ससून रुग्णालय गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा आहे का? वडेट्टीवारांचा सवाल

Monsoon Update : ला निनामुळे चांगल्या पावसाची अपेक्षा

गेल्यावर्षी हवामानाचा एल निनो परिणाम होता. त्यामुळे पाऊस सरासरीपेक्षा कमी झाला होता. यावर्षी एल निनोच्या उलट ला नीना अपर्नाम सक्रिय असल्याने पाऊस सरासरीपेक्षा जास्त शक्यता आहे. शिवाय भारतीय उपखंडावर गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत असल्याने मान्सूनची वाटचाल जोग्य गतीने सुरु राहील, असा अंदाज आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img