23.1 C
New York

Dhadak 2 : एक था राजा, एक थी राणी… खत्म कहानी” ‘धडक २’ ची घोषणा!

Published:

Dhadak 2 : एक था राजा, एक थी राणी… खत्म कहानी” ‘धडक २’ (Dhadak 2) ची घोषणा!पहिल्यांदाच झळकणार बॉलीवूडची ‘ही’ फ्रेश जोडी! कारण जोहर ने केली ‘धडक २’ नवीन चित्रपटाची घोषणा.

Dhadak 2 : एक था राजा, एक थी राणी… खत्म कहानी” ‘धडक २’ ची घोषणा! मराठी मनोरंजन विश्वातील ‘सैराट’ (Sairat) हा चित्रपट २०१६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. सैराट चित्रपटात रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar) या दोन कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिग्दर्शित नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अफलातून कमाईचा रेकॉर्ड ब्रेक केला होता. सर्व प्रेक्षक व इतर कलाकारांचं भरभरून प्रेम या चित्रपटाला मिळालं. सर्वत्र कौतुकाचा वर्षाव या चित्रपटावर होताना पाहायला मिळालं. त्यानंतर काही महिन्यांनीचं बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) या चित्रपटाचा हिंदीत रिमेक करण्याचं जाहीर केलं.

‘सैराट’ (Sairat) चित्रपटाचा हिंदी रिमेक असलेला ‘धडक’ (Dhadak) या चित्रपटात २०१८ मध्ये जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) आणि ईशान खट्टर (Ishan Khattar) यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. ‘धडक’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खैतान यांनी केलं होत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ‘सैराट’ चित्रपटांसारखा फारकाही चालू शकला नाही. पण यामधली सर्व गाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. त्यानंतर आता तब्बल ६ वर्षांनी करण जोहरने ‘धडक २’ची घोषणा केली आहे.

‘धडक २’ हा चित्रपट करण जोहरने २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होईल असं जाहीर केलं आहे. या चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर करत करणने त्याला “यह कहानी है थोड़ी अलग क्यूंकि एक था राजा, एक थी रानी – जात अलग थी…खतम कहानी” असं लक्ष वेधून घेणार कॅप्शन लिहिलं आहे. आता या ‘धडक २’ मध्ये नक्की कोण झळकणार त्याबद्धल सांगायचं झालं तर, चित्रपटातील मुख्य भूमिका बदलण्यात आल्या आहेत. जान्हवी कपूरची जागा ‘धडक २’ मध्ये तृप्ती डिमरीने घेतली आहे तर, ईशान खट्टरऐवजी ‘धडक २’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदीने बाजी मारली आहे.

अशातच, तृप्ती डिमरी बद्धल सांगायचं झालं तर, ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात तृप्ती डिमरीने आपला अनोखा अंदाज दाखवला होता. ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटात रणबीर कपूरबरोबर केलेल्या इंटिमेट सीनची सर्वत्र चर्चा रंगली होती. तृप्ती डिमरी ‘अ‍ॅनिमल’मुळे नॅशनल क्रश झाली होती. येणाऱ्या काळात तृप्ती चे बरेच चित्रपट येणार आहेत तर वेगवेगळ्या अंदाजात तृप्ती डिमरी झळकणार आहे. तसंच सिद्धांतच सांगायचं झालं तर तो ‘गल्ली बॉय’ चित्रपटातून प्रसिद्ध झाला. ‘गल्ली बॉय’ या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांच्या मुख्य भूमिका होत्या. तर २०२२ मध्ये आलेला ‘गेहराहीया’ या चित्रपटात सिद्धांतने अनन्या पांडे आणि दिपीका पादुकोण यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img