8.7 C
New York

Johnny Wactor: हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याची गोळ्या झाडून हत्त्या!

Published:

२५ मे रोजी हॉलिवूड (Hollywood) अभिनेता जॉनी वॅक्टरची (Johnny Wactor) हत्या करण्यात आली. त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. हा हल्ला लॉस एजंलिसमध्ये चोरांनी केलेला असून जॉनीला प्राण गमवावे लागले आहे. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जॉनी वॅक्टर हा फक्त 37 वर्षांचा होता. या घटनेनंतर हॉलिवूडमध्ये शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जॉनीची आई स्कारलेट यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले की, शनिवारी सकाळी 3 वाजण्याच्या सुमारास जॉनीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्याच्या कारमधून चोरांना काही वस्तू चोरायच्या होत्या. जॉनीने चोरांचा कोणताही प्रतिकार केला नाही. परंतु, त्याची हत्या करण्यात आली असल्याचे त्याच्या आईने सांगितले.

पहिली भारतीय चित्रपट निर्माती म्हणून कान्समध्ये पटकवला पुरस्कार!  

हॉलिवूडमधील कलाकारांनी जॉनीच्या हत्तेप्रकरणी संताप व्यक्त केला आहे. डेव्हिड शॉलने ‘पीपल मॅगझिन’शी बोलताना जॉनीबदल म्हणाला,” हा एक भला माणूस आहे. त्याला ओळखणाऱ्या प्रत्येकासाठी तो एक अद्भुत व्यक्ती होता. त्याने कठोर परिश्रम केले आणि कधीही हार मानली नाही. व्यावसायिक जीवनातही त्याने आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला”. जॉनीच्या मृत्यूच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला असल्याचे शॉलने सांगितले.


दरम्यान, जनरल हॉस्पिटल शिवाय जॉनीने एनसीआयएस, वेस्टवर्ल्ड, द ओए, स्टेशन 19, ट्रेनिंग डे, बार्बी रिहॅब, सायबेरिया, द पॅसेंजर, एजेंट एक्स, अॅनिमल किंगडम,वँटास्टिक, हॉलिवूड गर्ल आदी सीरीज, शोमध्ये जॉनीने काम केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img