16.1 C
New York

Malegaon Firing : मालेगावात एएमआयएमचे माजी महापौरावर गोळीबार

Published:

मालेगाव

मालेगाव (Malegaon) येथील एएमआयएमचे (AMIM) नेते तथा माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा (Abdul Malik Yunus Issa) यांच्यावर गोळीबार (Malegaon Firing) झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री अब्दुल मलिक हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला आहे. सध्या अब्दुल यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना तीन गोळ्या लागल्या आहेत.

माजी महापौर अब्दुल मलिक युनूस इसा यांच्यावर नाशिकमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्याठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला. आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. राजकीय सुडापोटी गोळीबार झाल्याची चर्चा सध्या आहे. मालेगाव शहरात दोन दिवसांत दोन गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेची माहिती मिळल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, साहाय्यक पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कार्यकर्त्यांना शांत करत आरोपींना लवकरच पकडण्यात येणार असल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img