21 C
New York

Devendra Fadnavis : संजय राऊतांवर देवेंद्र फडणवीस बरसले

Published:

नागपूर

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Rauit) यांनी रविवारी दैनिक सामनातून अग्रलेख लिहिला होता. यावेळी त्यांनी भाजपच्या (BJP) अंतर्गत राजकारणावर भाष्य केलं होतं. अमित शाह (Amit Shah) यांच्या हातात सूत्रे गेल्यास ते पहिला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा पत्ता कट करतील, असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुळात म्हणजे संजय राऊत यांच्याबाबत मला एकही प्रश्न विचारत जाऊ नका. जे लोक गांजा पिऊन लेख लिहितात त्यांच्याबाबद्दल काय बोलावे.मला अशी माहिती आहे की, ते लंडन गेले आहेत. लंडनमध्ये चांगले मानसोपचार तज्ञ आहेत, त्यामुळे त्यांनी तेथे चांगले उपचार घ्यावेत, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या फॉर्म्युल्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमची चर्चा सुरू आहे. तुम्हाला काही माहिती मिळते ते मिळू द्या. आमच्यात काही गडबड नाही. विधानसभा निवडणुकीचा फॉर्म्युला तिन्ही पक्षाचे नेते बसवून ठरवतील. भाजप मोठा पक्ष म्हणून आम्हाला जास्त जागा मिळतील. इतर पक्षाचा सन्मान राखून त्यांना जागा दिल्या जातील, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तसेच या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारलाच बहुमत मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा नुकताच पार पडला असून सातव्या टप्यासाठी १ जूनला मतदान होणार आहे. सर्वांना ४ जूनच्या निकालाची आस लागली आहे. दरम्यान, लोकसभेच्या निकालापूर्वी विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत. संजय राऊत यांनी कालच्या सामनाच्या ‘रोखठोक’ सदरातून भाजपवर आरोप केले होते. नितीन गडकरींच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. तसेच फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img