3.6 C
New York

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे भाजप संदर्भात मोठे वक्तव्य

Published:

मुंबई

राज्यातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election) पाच टप्पे पार पडले असून आता 4 जूनला लागणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने आज मुंबईत प्रमुख नेत्यांचा आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर मोठे वक्तव्य केले आहे.

छगन भुजबळ म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला सर्वात कमी जागा आल्या होत्या. 2019 मध्ये निवडून आलेल्या जागांचा निकष त्यावेळी लावण्यात आला होता. कुठल्या पक्षाकडे निवडून आलेली कुठली जागा आहे, त्या आधारावर जागा वाटप करण्यात आलं होतं. लोकसभेसारखी विधानसभेला जागा वाटपात खटपट होता कामा नये. आपण महायुतीमध्ये आलो, तेव्हा त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले.

लोकसभेसारखी विधानसभेला खटपट नको, आम्हाला एवढ्या जागा हव्या हे त्यांना सांगाव लागेल. 80-90 जागा मिळाल्या, तर 50-60 निवडून येणार. तुमचे 50 आहेत, मग 50 घ्या असं होता कामा नये. त्यामुळे आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे असं छगन भुजबळ म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img