21 C
New York

Threat Call : ‘या’ ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन

Published:

मुंबई

मुंबईमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस (Mumbai Police) यांच्या नियंत्रण कक्षाला पुन्हा धमकीचा फोन (Threat Call) आला आहे. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या हॉटेल ताज (Hotel Taj) आणि मुंबई विमानतळ (Mumbai Airport) इतर प्रमुख ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असल्याचा फोन मुंबई पोलीस कंट्रोल रूमला आला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रमुख स्थळांची सुरक्षित वाढ करण्यात आली आहे. तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांना फोन करून ताज हाॅटेल आणि मुंबई विमानतळसह इतर ठिकाणी बाॅम्ब ठेवल्याची धमकी दिली आहे. आज दुपारी पोलिसांना हा फोन आला, अशी माहिती मिळत आहे. धमकीचा फोन येतात मुंबई पोलीस सतर्क झाली आहे. पोलिसांनी फोन लोकेशन तपासले असता हा फोन उत्तर प्रदेशमधून आला असल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

तसेच ज्या ठिकाणांवर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. तसेच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img