मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा सुपुत्र अनंत अंबानी (Anant Ambani) 12 जुलै रोजी राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नबंधनात अडकणार आहे. परंतु लग्नाआधी कुटुंबांनी या जोडप्यासाठी दुसऱ्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनची योजना आखली आहे. चार दिवस चालणाऱ्या या लक्झरी क्रूझ सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटी, क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती, राजकारणी आणि व्यापारी उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा 29 मे रोजी सुरू होणार असून 1 जून रोजी समारोप होणार आहे.
आलिया भट्ट, रणबीर कपूर, सलमान खान, रणवीर सिंग, अयान मुखर्जी आणि इतर अनेक बॉलीवूड कलाकार मुंबईहून रवाना झाले आहेत. या कार्यक्रमाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये उत्सवाचे मनोरंजक पत्रिका व्हायरल झाली आहे. दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी, प्रत्येक थीमसाठी ड्रेस कोड आखण्यात आला आहे. तर सर्व पाहुण्यांना आमंत्रणांसोबत पाठवण्यात आले आहे. युरोपमधील लक्झरी क्रूझच्या प्रवासाच्या कार्यक्रमानुसार, इटली ते फ्रान्सच्या दक्षिणेपर्यंतचा 4,380 किलोमीटरचा नयनरम्य प्रवास नियोजित करण्यात आला आहे.
पहिली भारतीय चित्रपट निर्माती म्हणून कान्समध्ये पटकवला पुरस्कार!
29 मे, बुधवार – उत्सवाची सुरुवात स्वागत भोजनाने होईल. ड्रेस कोड ‘क्लासिक क्रूझ’ असेल. यानंतर ‘स्टारी नाईट’ थीम असलेला कार्यक्रम होईल, ज्यासाठी ड्रेस कोड पाश्चात्य औपचारिक आहे.
30 मे, गुरुवार – सर्व पाहुणे रोममध्ये उतरतील आणि त्यांनी पर्यटकांचे आकर्षक कपडे घालावेत. La Dolce Far Niente ही थीम असेल. दिवसाची सांगता क्रूझवरील ‘तोगा पार्टी’ने होईल.
31 मे, शुक्रवार – या दिवसाची थीम आहे ‘व्ही टर्न वन अंडर द सन’, ‘ले मास्करेड’ आणि ‘पर्डन माय फ्रेंच.’ क्रूझवरील आफ्टरपार्टीने त्याची सांगता होईल.
1 जून, शनिवार – उत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘ला डोल्से व्हिटा’ थीम असेल आणि पाहुण्यांना इटालियन समरचा ड्रेस कोड पाळावा लागेल.
सुमारे 800 पाहुणे या भव्य पार्टीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मार्च 2024 मध्ये, अंबानींनी जामनगरमध्ये तीन दिवस अनंत आणि राधिकाचा साखरपुडा साजरा करत वर्षातील सर्वात भव्य पार्टी दिली. बॉलीवूड, हॉलिवूड, व्यवसाय, राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी या तीन दिवसीय कार्यक्रमात हजेरी लावली. या सोहळ्याला शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांची प्रमुख आकर्षणे होती.