मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने आज मुंबईत (Mumbai) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांनी 2004 मधील मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून हल्लाबोल केला आहे.
अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी 2004 बाबत जे सांगितले ते धादांत खोट आहे. 2004 मध्ये मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती मला वाटत होतं की ज्येष्ठ नेते असल्याने छगन भुजबळ यांना संधी मिळेल. 1991 मध्ये ज्याप्रमाणे कोणी ऐकलं नव्हते त्याचप्रमाणे 2004 मध्ये शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटले असेल की आपलं आधीच कोणी ऐकलं नाही. त्यामुळे आता पुन्हा मुख्यमंत्री केलं का आपलं कोणी ऐकणार नाही त्यामुळेच कदाचित मुख्यमंत्री पद घेण्यात आलं नसावे असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला मानसन्मान हवा असतो. कार्यकर्ता महत्त्वाचं असतो. लोक देतील तो कौल मान्य करून आपण पुढं जायला हवं. अशी भूमीका सर्वांनी मान्य करायला हावी. आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. मागचा वेळी 41 जागा भाजप युतिच्या होत्या तर विरोधक 7 जागेवर होतें. त्यामुळं आपल्याला यांदा जागा कमी मिळाल्या. सातारची जागा जरी आपण दिली असली तरी आता त्या बदल्यात मिळणारी जागा सातारला देण्यात येणार आहे. ही सर्वांनी नोंद घ्यावी. सातारची राज्यसभेची जागा आपण सातारला देणारं आहोत. इतराणी मागणी करू नये.