3.6 C
New York

Abhijit Panse : कोकणातून अभिजीत पानसे मनसेकडून पदवीधरसाठी मैदानात

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Elections) करता राज्यातील मतदानाचे टप्पे पूर्ण झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Elections) निकालाची प्रतीक्षा 4 जून पर्यंत करावी लागणार आहे. आता राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) विधान परिषदेच्या (Legislative Council Elections) शिक्षक आणि पदवीधर संघाच्या चार जागेची निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (Maharashtra Navnirman Sena) कोकण पदवीधरसाठी उमेदवार रिंगणात उतरवला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजीत पानसे (Abhijit Panse) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या चार जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्वप्रथम दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली. यानंतर आता मनसेकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाकरिता 26 जून रोजी मतदान होणार आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनिस, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील, नाशिक शिक्षकमधून किशोर दराडे आणि कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. नवीन कार्यक्रमानुसार पुढील महिन्यात 26 जून रोजी मतदान होणार आहे आणि 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच ठाकरे गटाने कसलीही वाट न पाहता आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. अनिल परब यांचा 27 जुलै 2024 रोजी विधानपरिषदेवरील कार्यकाळ संपणार आहे. पण ठाकरे गटाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता परब यांना विधानपरिषदेवर पुन्हा निवडून जाणे हे ठाकरे गटासाठी आव्हानात्मक ठरु शकते. त्यामुळे अनिल परब यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी ठाकरेंनी सावध खेळी केली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

विधान परिषदेच्या 4 जागांसाठी 31 मे ते 7 जून पर्यंत उमेदवारांना अर्ज भरता येणार आहे. यानंतर 10 जून रोजी उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी होईल आणि 12 जूनपर्यंत उमेदवारांना त्यांचा अर्ज मागे घेता येईल. यानंतर 26 जून रोजी मतदान होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.

अभिजीत पानसे मनसेची की, महायुतीची?
कोकण पदवीधरमधून मनसेने अभिजीत पानसेंना उमेदवारी जाहीर केली. मात्र आता पानसेंची उमेदवारी ही मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झाला आहे. कोकण पदवीधरमधून डावखरे हे भाजपचे आमदार आहेत. त्यांचा कार्यकाळ संपतोय, त्याच जागेवर मनसेने उमेदवारी जाहीर केलीय. त्यामुळे आता ही उमेदवारी मनसेची की महायुतीची असा सवाल उपस्थित झालाय. कोकण पदवीधरसाठी येत्या 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img