3.7 C
New York

IPL Final : आयपीएलच्या विजयी संघाला काय बक्षीस मिळणार ?

Published:

IPL 2024 सीझनमधील अंतिम सामना (IPL 2024 Final) KKR आणि हैदराबाद टीममध्ये (IPL Final) रंगणार आहे. ट्रॉफी आणि बक्षीसाची मोठी रक्कमही विजयी संघाला मिळणार आहे.इतकेच नव्हे तर पराभूत संघही मालामाल होणार आहे. चेन्नईतील एम.ए. चिदंबरम मैदानामध्ये केकेआर आणि हैदराबाद यांच्यामध्ये सामना होणार आहे. आयपीएल स्पर्धेमध्ये हैदराबादने एकदा जेतेपद पटकावलंय तर केकेआर टीम दोनदा विजयी झाली आहे. त्यामुळे यंदा IPL 2024मधील अंतिम सामना कोणता संघ जिंकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या विजयी संघाला किती रोखरक्कम बक्षीस स्वरुपात मिळणार आहेत? हे जाणून घेऊया.

IPL Final कोणती टीम होईल मालामाल?

BCCIने आयपीएलच्या 17व्या सीझनसाठी 46.5 कोटी रुपये बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे. विजेत्या संघाला 20 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 13 कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहे. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघांना अनुक्रमे 7 कोटी रुपये आणि 6.5 कोटी रुपयांचे बक्षीस मिळेल.

IPL Final पर्पल कॅप व ऑरेंज कॅप विजेत्यांना काय मिळणार बक्षीस?

आयपीएलच्या 14 सामन्यांमध्ये 741 धावांची शानदार खेळी करणारा विराट कोहली (Virat Kohli) ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याला 15 लाख रुपयांचे बक्षीस मिळू शकते. तर पंजाब किंग्स टीममधील हर्षल पटेलने 24 विकेट घेतल्याने पर्पल रंगाची कॅप त्याच्याकडेच राहील. पटेलला देखील 15 लाख रुपयांचे मिळेल

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया सज्ज

IPL Final इमर्जिंग प्लेअर आणि मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर अवॉर्ड

यंदाच्या सीझनमधील ‘इमर्जिंग प्लेअर ऑफ द इअर’ पुरस्काराचा मानकरी ठरणाऱ्या खेळाडूला 20 लाख रुपये तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरला 12 लाख रुपयांचा धनादेश बक्षीस स्वरुपात मिळणार आहे.

IPL 2024

आयपीएलचा यंदाचा सीझन खूपच मनोरंजक ठरला. सर्व संघांनी शानदार खेळी खेळली. पण KKR आणि हैदराबाद टीमने दमदार प्रदर्शन करत अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img