26.6 C
New York

Jejuri : लोकदैवत खंडोबाचा गाभारा मोगरा फुलांनी सजला

Published:

विजयकुमार हरिश्चंद्रे / जेजुरी

राज्याचे कुलदैवत जेजुरीच्या मल्हारी मार्तंड गाभाऱ्याला गुरव पुजारी (Jejuri) कोळी वीर घडशिया मंदिर उपासक समाजाच्या वतीने शेकडो मोगरा फुलांची सजावट करण्यात आली. यामुळे संपुर्ण गाभारा परिसर सुगंधी झाला होता देवीदेवतांच्या सर्वात जवळ अस्तित्व दर्शविणाऱ्या अनेक फुलांचे सुगंध धार्मिक निसर्ग आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्याला मंदिर परिसरात पाहवयास मिळते.

जेजुरीच्या खंडोबा देवाला शेकडो फुलांना अर्पित करुन येथिल मंदिर कुलधर्म कुलाचार उपासक गुरव पुजारी, कोळी घडशी विर सह मार्तंड देवसंस्थान समिती कर्मचारी सेवेकरी वर्गाने मोगरा फुलांचा अभिषेक घातला. मोगरा हे फुल साक्षात् प्रभू शिव शंकर महादेवाला प्रिय असुन जेजुरीच्या खंडोबा देव महादेवाचा अवतार मानला जातो वैशाख महिन्यात गुरव समाजाच्या वतीने धार्मिक पूजन करुन शेकडो किलो मोगरा देवांना अर्पित केला.

हॉस्पिटलला भीषण आग; सहा नवजात बालकांचा मृत्यू

मल्हारी मार्तंड भैरव स्वरुपात असताना चाफा आणि मोगरा फुलांची उधळण केली जाते यात भगवंताला आवडणारा सुगंध आणि शांतता प्रधान केली जाते. गुरव पुजारी आरती करित देवाला जग शांती समाधान आणि उत्तम पर्जन्य वृष्टीची प्रार्थना करतात यावेळी गुरव पुजारी बारभाई, सातभाई, दिडभाई, आगलावे, क्षीरसागर कटफलकर.हरिश्चंद्रे, गुरव तसेच सेवकरी मोरे लांघी हे नेहमीच पूजाअर्चना पूर्वपरंपरा है धार्मिक संस्कार राबवित असतात इत्यादींनी हा उपक्रम स्वयमं खर्चाने राबविला. आहे

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img