20.9 C
New York

Pen : आंबिवली येथील हत्या प्रकरणात महिलेसह सहा जणांना अटक

Published:

पेण

पेण तालुक्यातील (Pen) आंबिवली फाट्यानजिक पोलिसांना एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला होता. कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसतांना या गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. खुनाच्या प्रकरणात पोलिसांनी एका महिलेसह आरोपींना अटक केली आहे.

या बाबत प्राप्त महितीनुसार, मुंबई गोवा महामार्गावर अंबिवली फाट्या नजीक पोलिसांना एक मृतदेह आढळला होता. यासंदर्भात अधिक तपास केला मयत अभिषेक (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) असुन हा हॉटेल पंजाबी पॅलेस, पनवेल याठिकाणी कामाला होता. याच हॉटेलमध्ये एक महिला देखील सफाईचे काम करीत होती. मयत अभिषेक हा महिलेला त्रास देत होता. तसेच तिचे मोबाईलमध्ये व्हिडीओ बनवत होता. त्यानंतर तो काम सोडून निघून गेला होता.

अभिषेक १७ मे रोजी केलेल्या कामाचा पगार घेणेसाठी सदर हॉटेलवर आला होता. त्यावेळी अभिषेकने सफाई कामगार महिलेचा मोबाईल चोरी केला. या संदर्भात सफाई कामगार महिलेने हॉटेलमध्ये काम करणारे मनोज विष्णु गांगुर्डे, गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे, सुमीत केशव चौरे मॅनेजर, वेटर व स्वयंपाकी यांच्याकडे अभिषेकची तक्रार केली. त्यावरून मॅनेजर मनोज गांगुर्डे याने अभिषेकला संपर्क साधून दि. १९ मे रोजी बोलावून घेतले. यावेळी तु महिलेस का त्रास दिला व तिचा मोबाईल का चोरी केला? याबाबत जाब विचारला. यावेळी झालेल्या बाचाबाची वरून सर्वांनी मिळुन अभिषेकला लाथाबुक्यांनी खाली पाडून छातीवर, पोटावर मारल्याने तो जागीच मयत झाला.

मयत झालेनंतर त्याला हॉटेलच्या फ्रीजमध्ये कोंबून बसविले व एक भाडयाचा टेम्पो बोलावून सदर मयत बसविलेला फ्रीज टेम्पोमध्ये घालून ग्रीन पार्क धाब्यावर आणून ठेवला. त्यानंतर अभिषेकच्या बाँडीला गोणीमध्ये बांधणेसाठी पनवेल येथून अनुज चंद्रशेखर मोरे व त्याचा मित्र राज (पुर्ण नाव माहित नाही) यांनी बीग साडी बाजार पनवेल येथुन गोणी खरेदी केली. त्यानंतर फ्रीजमधून अभिषेकच्या बाँडीला बाहेर काढून गोणीत भरून अनुज व राज यांनी गोणीत बांधलेला मृतदेह स्कुटीवरून नेऊन अंबीवली फाट्यावर रस्त्याच्या कडेला फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी मनोज विष्णु गांगुर्डे, गणेश नारायण देशमुख, कानिफनाथ सुरेश म्हात्रे, सुमीत केशव चौरे, अनुज चंद्रशेखर मोरे व रसायनी येथून सफाई कामगार महीला अश्या सहा जणांना अटक केली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक धनाजी साठे, पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, प्रसाद पाटील, पोलिस हवालदार संदीप पाटील, सुधीर मोरे, अमोल हंबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, राकेश म्हात्रे, रूपेश निगडे, पोलिस शिपाई ईश्वर लांबोटे, स्वामी गावंड, अक्षय जगताप, अक्षय सावंत, बाबासो पिंगळे, लालोसो वाघमोडे, ओंकार सोंडकर, भरत तांदळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पेण पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img