देशात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. सहा टप्प्यांतील मतदान झालं आहे. (Lokshabha Election)आता सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान १ जून रोजी होणार आहे. राज्यातील मतदान पाच टप्प्यांत आटोपलं आहे. आता निकालाची उत्सुकता आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांचे आरोप प्रत्यारोप काही थांबलेले नाहीत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजप नेत्यांवर खळबळजनक आरोप केला आहे. चार जूननंतर भाजपात नरेंद्र मोदी आणि अमित शहांना पाठिंबा राहणार नाही. नागपूरमध्ये नितीन गडकरींचा पराभव व्हावा यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केले असा मोठा दावा राऊत यांनी केला आहे.
Lokshabha Election मोदी-शहा पुन्हा सत्तेत आले
राऊत पुढे म्हणाले, नागपुरात नितीन गडकरींचा पराभव करण्यासाठी सर्व प्रकारची रसद देवेंद्र फडणवीस यांनीच पुरवली असे संघाचेच लोक सांगताना दिसत आहेत. गडकरींचा पराभव होत नाही असे लक्षात आल्यानंतर नाईलाजाने त्यांना नागपुरात गडकरींच्या प्रचारासाठी यावं लागलं. मोदी-शहा पुन्हा सत्तेत आले तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घरी पाठवून देतील. यामुळेच योगी आदित्यनाथ यांच्या समर्थकांकडून योगी को बचाना है असे संदेश देण्यात आले. आता चार जूनच्या निकालात सर्वकाही स्पष्ट होईल असा इशारा राऊत यांनी दिला.
शरद पवारांचे शिलेदार सोडणार साथ?
नरेंद्र मोदींनी त्यांच्या मित्रांची संपत्ती वाढवली. त्याच संपत्तीवर राजकारण केलं. गरीबांना धर्माच्या अफू नावाची गोळी दिली. गुलामांना गुंगीत ठेऊन स्वतः मात्र मौज करत राहिले. आता ते विरोधकांवर खोटे आरोप करत आहेत. ओरडत आहेत. पण त्यांचे हे सर्व खेळ चार जूननंतर बंद होतील असे राऊत म्हणाले. दिल्लीने महाराष्ट्रातील काही बेडकांना फुगवलं त्यांना नेता केलं. पण आता हे नेते लवकरच राजकीय पटलावरून नष्ट होतील. एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर निवडणुकीत केला. अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने प्रयत्न केले असा आरोप संजय राऊत यांनी केला.