पुणे
राज्यात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह (Paramveer Singh) यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर आरोप करत टाकलेल्या लेटर बॉम्ब (Letter Bomb) प्रचंड गाजले होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-मेल पाठवून त्यांनी 100 कोटी रुपये वसुली करण्याचे आदेश दिल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. मात्र त्यानंतर राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विराजमान आहे. शिंदे यांच्या पक्षातील मंत्र्यांविरोधात आता एका अधिकाऱ्याने लेटर बॉम्ब टाकला आहे. शिंदे यांनी पत्र लिहित खळबळजनक आरोप केले आहे.
पुणे महापालिकेचे निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी आपल्या निलंबनाच्या कारवाई विरुद्ध थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय. त्यात त्यांनी थेट एका मंत्र्यावर आरोप कलेत. त्यामुळे भगवान पवार यांनी आरोप केलेले मंत्री नेमके कोण? त्यांचा रोख नेमका कुणावर आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. याशिवाय, त्यांनी निलंबन मागे घेण्याची विनंतीदेखील केलेली आहे.
भगवान पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राज्याचे मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात आपण मागासवर्गीय अधिकारी असल्यामुळे हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने निलंबन करण्यात आल्याचा दावा भगवान पवार यांनी पत्रात केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची नेते तथा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप लावले आहे.
भगवान पवार यांनी पत्रात म्हटले आहे की, मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करण्यासाठी दबाव आणला होता. परंतू मी नियम बाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे.
डॉ. भगवान पवार यांनी पत्रात काय आरोप केले?
निलंबित अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी आपल्या पत्रात आरोग्य मंत्र्यांवर अनेक आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील ज्येष्ठतम अधिकारी असून माझी एकूण 30 वर्षांची सेवा झालेली आहे. मागच्या पाच वर्षात माझी कामगिरी अत्यंत चांगली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची माझ्या कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. करोना काळात मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली. आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई, विभागायी आयुक्त, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडून माझा वेळोवेळी सत्कार झाला आहे.
माझे कामकाज आणि सेवेची नोंद उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून मला त्रास देण्याच्या हेतूने माझे निलंबन करण्यात आले आहे. मा. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे आणि इतर कामामध्ये मदत करण्यास दबाव आणला होता. परंतु मी नियमबाह्य कामात मदत केली नाही हा आकस मनामध्ये ठेवून माजी मानसिक छळवणूक केली आणि माझे निलंबन केले असा आरोप डॉ. भगवान पवार यांनी केला.