21 C
New York

Mega Block : 1 जूनला सीएसएमटी ते भायखळा 36 तासाचा विशेष ब्लॉक

Published:

मुंबई

मध्य रेल्वेवर (Central Railway) एक मोठा ब्लॉक घेण्याची तयारी सध्या सुरू आहे. शनिवारी 1 जूनला मध्यरात्रीपासून जवळपास 36 तासांचा हा मेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाईल. यात जवळपास 600 लोकलच्या फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. हा ब्लॉक हार्बर मार्गावर सीएसएमटी ते वडाळा आणि मेन लाईनला सीएसएमटी (CSMT) ते भायखळा (Byculla) दरम्यान घेण्यात येईल. याकाळात लोकल (Local) सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. याचा लांबपल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.

सीएसएमटी स्थानक ऐतिहासिक आहे. देशातील सर्वात व्यस्त टर्मिनस म्हणून या स्थानकाची ओळख आहे. सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात येतात. तर मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन आणि हार्बर मार्गावर दररोज 1 हजार 810 लोकल चालविण्यात येतात. त्यापैकी 1 हजार 299 हून अधिक लोकल सीएसएमटी स्थानकातून ये-जा करतात. सीएसएमटी स्थानकातील मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे मध्य रेल्वेने हाती घेतले आहे.

शनिवार 1 जूनला मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल वडाळा ते सीएसएमटी आणि मेन लाईनवर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्यात येतील. याशिवाय, सीएसएमटी वरूनसुटणाऱ्या 100 लांब पल्ल्याच्या गाड्यांपैकी 60 टक्के गाड्यांवरही त्याचा थेट परिणाम होणार आहे. 

प्लॅटफॉर्म 10 ते 14 चा विस्तार 24 डब्यांच्या गाड्या चालविण्यासाठी करण्यात येत असून हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. प्लॅटफॉर्मचा विस्तार सुमारे 305 ते 382 मीटरपर्यंत वाढविण्यात येत असल्याने गाड्यांचे डब्बे वाढविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवासी वहन क्षमता 20 टक्क्यांनी वाढणार आहे.

तसेच यार्ड रिमॉडेलिंग आणि अत्यावश्यक सेवा इमारतींच्या बांधकामासोबत प्रकल्पामध्ये 61 जुने ओव्हर हेड इक्विपमेंट मास्ट्स, 71 सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन अडथळे काढण्यात येणार आहेत. अपग्रेडेशनच्या कामात रुट रिले इंटरलॉकिंगपासून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगपर्यंत ट्रॅकच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी ब्लॉक घेण्याचे नियोजन करत आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img