मुंबई
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाच टप्प्यात मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Nadkari) यांना पराभूत करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सह राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रयत्न केल्याचा दावा शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनातून रोखठोक या सदरामधून केला आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात हा चर्चेचा विषय बनला आहे.
संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक या सदरामध्ये म्हटले आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पराभूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्यातील भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले आहे. तसेच नितीन गडकरी यांचा प्रभावासाठी सर्व रसद देवेंद्र फडणवीस यांनी पुरवली आहे. हे राष्ट्रीय सेवक संघाचे लोक नागपुरात उघडपणे बोलत असल्याचे देखील मुखपत्रात म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून नंतर लागणार आहे. 4 जून नंतर भाजपमध्ये अंतर्गत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना पाठिंबा राहणार नाही. नितीन गडकरी यांचा नागपुरात पराभव व्हावा यासाठी मोदी शहा आणि फडणवीस आणि एकत्रित प्रयत्न केले. मात्र नितीन गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री आल्यानंतर फडणवीस नाईलाजाने प्रचारासाठी मैदानात उतरले असे देखील मुखपत्रात म्हटले आहे.