22.9 C
New York

Bangladeshi : बांगलादेशी 20 घुसखोर नागरिकांना कारावास व दंडाची शिक्षा

Published:

मुंबई

बोगस पासपोर्ट बनवून अनधिकृत (Illegal Residence) रित्या मुंबई (Mumbai) आणि पुण्यात (Pune) राहणाऱ्या बांगलादेशी (Bangladeshi) 20 नागरिकांना किल्ला कोर्टाने (Mumbai Court) 8 महिन्याचे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच 4 हजार रुपयांचा दंड ठोठावली आला आहे. बोरवली पोलिसांकडून मागील वर्षी या बांगलादेशी व्यक्तींवर कारवाई करण्यात आले होते.

मिळाल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यांत बोरिवली पोलिसांच्या एका विशेष पथकाने बोरिवली, नालासोपारा, विरार आणि पुण्यात वास्तव्यास असलेल्या वीस बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बोगस आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्टसह इतर साहित्य जप्त केले होते. चौकशीत ते सर्वजण बांगलादेशातील बेरोजगारी आणि उपासमारीला कंटाळून भारतात नोकरीसाठी आले होते. बांगलादेशातून अवैध मार्गाने भारतात प्रवेश केल्यानंतर ते सर्वजण काही महिने कोलकाता येथे राहत होते. त्यानंतर ते सर्वजण पुणे, नालासोपारा आणि विरार येथे राहण्यासाठी गेले. तिथेच त्यांनी भारतीय नागरिक असल्याचे बोगस दस्तावेज बनविले होते.

या दस्तावेजाच्या मदतीने त्यांनी भारतीय पासपोर्ट मिळविले होते. या पासपोर्टवर व्हिसा मिळवून त्यातील काही बांगलादेशी नागरिक आखाती देशात नोकरीसाठी जाणार होते. मात्र त्यापूर्वीच या वीस बांगलादेशी नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली. या आरोपींविरुद्ध नंतर किल्ला न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले. या खटल्याची अलीकडेच सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्या. झनवट यांनी वीस बांगलादेशी नागरिकांना दोषी ठरवून त्यांना आठ महिन्यांच्या कारावासासह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img