नाशिक
राज्यात लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) पाचही टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलं ते 4 जूनच्या निकालाकडे आहे. राज्यात झालेल्या निवडणुका (Loksabha) नंतर मतदान पेटी स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आली आहे. मतपेट्या ज्याचे ठेवण्यात आल्या तेथे संशयितपणे काही व्यक्ती फिरत असल्याची तक्रार विरोधकांकडून (Mahavikas Aghadi) करण्यात येत होता. त्यामुळे या ठिकाणी विरोधी पक्षाचे प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहे.
दक्षिण नगर व बारामती लोकसभा मतदारसंघातील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर संशय व्यक्त केल्यानंतर नाशिक लोकसभा मतदार संघातील मत पेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या तेथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीने प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची केलेल्या मागणीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे
बारामती येथील स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 45 मिनिटांसाठी बंद पडले होते तर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या ज्याचे ठेवण्यात आल्या तेथे संशयितपणे काही व्यक्ती फिरत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. नाशिक लोकसभा मतदार संघाच्या मतपेट्या ज्या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आले आहे, येथे देखील संशय व्यक्त करण्यात आला होता. त्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडे मतमोजणी होईपर्यंत प्रतिनिधींची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिनिधींची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे.