एका वृद्धेच्या मृत्यूप्रकरणी सायन रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर राजेश डेरे यांना पोलिसांनी शनिवारी उशिरा (Sion Hospital Accident) अटक केली. डॉ. राजेश डेरे यांच्या भरधाव कारने शुक्रवारी रात्री सायन रुग्णालयाच्या आवारात एका 60वर्षीय महिलेला धडक दिली. संध्याकाळी साडेआठच्या सुमारास उपचार घेऊन हॉस्पिटलच्या गेट नंबर 7 मधून बाहेर येत असताना त्यांचा अपघात झाला. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्या महिलेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरून सायन पोलिसांनी डॉ. डेरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Sion Hospital Accident कारने धडक दिल्याचे उघडकीस
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेची केईएम, नायर, सायन, कूपर आणि ट्रॉमा ही मोठी हॉस्पिटल आहेत. त्यापैकी शिव येथे सायन हॉस्पिटल आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या रुबेदा शेख या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्या शुक्रवारी उपचारासाठी सायन रुग्णालयात आल्या होत्या. सायंकाळी पावणेआठ वाजता रुग्णालयातून बाहेर पडल्यावर तेथून वेगाने जाणार्या एका कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, रुबेदा शेखवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी अपघाताची माहिती दडवून ठेवली होती. मात्र, सायन पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर, तिला एका कारने धडक दिल्याचे उघडकीस आले होते. या कारचा क्रमांक पोलिसांना मिळाल्यानंतर, ती कार सायन रुग्णालयाच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर राजेश डेरे यांच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाले.
गेम झोनच्या आगीची थरकाप उडवणारी कहाणी..
डॉ. डेरे यांनी या घटनेबद्दल काही सांगण्यास नकार दिला. तथापि, हे हिट अॅण्ड रनचे प्रकरण नाही. संबंधित महिला त्यांच्या गाडीसमोर कोसळली आणि त्यामुळे तिला किरकोळ धडक बसली. गाडीचा वेग त्यावेळी जास्तीत जास्त ताशी पाच किलोमीटर असावा, असा दावा डेरे यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी केला आहे. उलट रुग्ण खाली कोसळल्यानंतर डॉ. डेरे यांनी स्वत: त्या महिलेला रुग्णालयात नेण्यास मदत केली, असेही या सूत्रांनी सांगितले. मृत्यूचे कारण ‘कार्डिओजेनिक शॉकट असल्याचे सांगितले जाते. कोविड महामारीच्या काळात डॉ. डेरे बीकेसीतील कोविड सेंटरचे डीन होते.