8.3 C
New York

Nitin Gadkari : संजय राऊत हिंमत असेल तर.., चंद्रशेखर बावनकुळे चिडले

Published:

मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्रक असलेल्या सामना दैनिकांमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या संदर्भात सामनातील संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या रोखठोक या विशेष सदरामधून भाष्य करण्यात आले आहे. यावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ट्विटरच्या माध्यमातून संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिले आहे. तसेच राऊतांना आवाहन दिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्वयंघोषित प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजपाच्या अंतर्गत राजकारणावर भाष्य केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपाच्या एकाच परिवारातील सदस्य आहेत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हे मूल्य घेऊन भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतो. पण संजय राऊत यांच्या बाबतीत प्रथम शरद पवार नंतर स्वतः आणि शेवटी उद्धव ठाकरे तसेच उबाठा गट असा क्रम आहे. त्यामुळे राऊत यांच्या डोक्यातून असेच काहीतरी बाहेर पडणार, अशी टीका त्यांनी केली आहे.

संजय राऊत हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कर्मचारी आहेत, पण ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांची चाकरी करतात. ते भ्रमिष्ट अवस्थेत ‘रोखठोक‘ लिहित असावेत. भाजपा हा पक्ष नाही तर परिवार आहे. ज्यांनी आयुष्यभर गटातटाचे राजकारण केले, त्या संजय राऊत यांना परिवार काय कळणार? 2019मध्ये स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी संजय राऊत यांनीही प्रयत्न केले होते. पण त्यांचा डाव यशस्वी झाला नाही. हिंमत असेल तर एक ‘रोखठोक‘ त्यावरही येऊ द्या, असे आव्हान त्यांनी दिले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img