-0.1 C
New York

Tiger population : ताडोबात वाघांची संख्या 32 ने वाढली

Published:

बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख्ख प्रकाशात दरवर्षी प्राण्यांची गणना केली जाते. (Tiger population) यावर्षी गुरुवारी, 23 तारखेला बुद्धपौर्णिमा होती. या प्रकाशात ताडोबा जंगलातील प्राण्यांची गणना करण्यात आली. यावेळी करण्यात आलेल्या गणनेत कोअर व बफर झोनमध्ये वाघांची संख्या 55, तर 17 बिबट आणि 65 अस्वल आढळले आहेत. दोन्ही ठिकाणी एकूण 5 हजार 009 वन्यप्राण्यांची नोंद घेण्यात आली. (Tiger population increased by 32 in Tadoba Know the number of other animals)

Tiger population गणनेत किती प्राणी आढळले?

एकूण 5 हजार 09 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

ताडोबा बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील मचाणांवर प्राणिगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबवण्यात आला. यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील 79 मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली होती. माय ताडोबा या संकेतस्थळावर निसर्ग अनुभव उपक्रमासाठी नोंदणी केलेले 160 निसर्गप्रेमी व 80 गाईड या उपक्रमात सहभागी झाले होते. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकांकडून चार हजार पाचशे रुपये शुल्क आकारण्यात आलं होतं. बफरझोनमध्ये वाघ 26 आढळून आले असून एका बछड्याचा समावेश आहे.

बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट

मागील वर्षी फक्त 14 वाघ आढळून आले होते. यावेळी 11 ने वाघांची संख्या वाढली आहे. बिबट 8 आढळून आले असून यावेळी 4 ने संख्या कमी झाली आहे. तर अस्वल 32, तृणभक्ष्यी प्राण्यांमध्ये भेडकी 18, चितळ 403, सांबर 166, चौसिंगा 8. निलगाय 34, रानगवा 344 असे एकूण 973 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. तसंच, वानर 340, रानडुक्कर 363, रानकुत्रा 17, सायळ 1, मुंगूस 10 आढळून आले. मांजर प्रकारामध्ये जवादी मांजर 2, उदमांजर 4, रानमांजर 3, खवल्या मांजर 9 तर इतर 32 वन्यप्राण्यांची नोंद करण्यात आली आहे.

Tiger population प्राण्यांची समाधानकारक नोंदणी

मागच्या काही महिन्यांपासून अवकाळीमुळे ताडोबातील नैसर्गिक स्त्रोतामध्ये पाणी साठून असल्याने वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासली नाही. पाठवठ्यावरुनही वन्यप्राण्यांची तहान भागत असल्याचं चित्र ताडोबात पाहायला मिळत आहे, पाणवठे व नैसर्गिक स्त्रोतावर वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने समाधानकारक नोदीं करण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img