8.4 C
New York

Sambhajinagar Airlines : संभाजीनगरमधून ‘या’ तारखेपासून गोवा, नागपूरला विमान सेवा

Published:

एअर एशियाची लवकरच बँकॉकला विमानसेवा

इंडिगो विमान कंपनीने २ जुलैपासून छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर व गोवा या ठिकाणी थेट विमानसेवा (Sambhajinagar Airlines) सुरू करणार असल्याचे घोषणा केली आहे. या दोन नवीन मार्गांमुळे छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हीटी वाढली आहे. लवकरच एअर एशियाची बँकॉक ही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार असल्याने या विमानतळावर काही दिवसांत प्रवाशांसह विमानांची वर्दळ वाढणार आहे.

नुकतेच इंडिगो विमान कंपनीने छत्रपती संभाजीनगर येथून नागपूर व गोवा या मार्गावर ७८ आसन व्यवस्था असलेली विमानसेवा २ जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विमान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी सेवा देणार आहे. या दोन मार्गांवर विमानसेवा सुरू होणार असल्याने छत्रपती संभाजीनगरची कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. येथून गोव्याला जाणारा तरुणवर्ग मोठा आहे. त्यामुळे या विमानाला प्रवासी मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, येथून गोवा आणि नागपूरसाठी सुरुवातीच्या काळात सुमारे ५ हजार रुपयांचे तिकीट दर असणार असून ते परिस्थितीनुसार कमी जास्त होते अशी माहिती इंडिगोचे येथील व्यवस्थापक अनुरूद्ध पाटील यांनी दिली.

Sambhajinagar Airlines : तीन दिवस सेवा

इंडिगोच्या या विमानांची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी अशी असून हे विमान नागपूर येथून सकाळी ९.४० वाजता उड्डाण करेल ते छत्रपती संभाजीनगरात सकाळी ११ वाजता पोहचेल. येथून ते ११.३० वाजता उड्डाण करेल ते गोवा येथे दुपारी १.३० वाजता पोहचेल. तर गोवा येथून दुपारी २.१० वाजता छत्रपती संभाजीनगरकडे उड्डाण करेल तर सायंकाळी ४.१० वाजता छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहचेल. येथून ते सायंकाळी ४.४० वाजता उड्डाण करून ते नागपुरात सायंकाळी ६.१० वाजता पोहचेल. या मार्गावरील बुकिंग सुरू झाली असून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img