4.1 C
New York

Premonsoon Drive : पावसाळ्याच्या तोंडावर नाले तुडुंब; दुर्गंधीबाबत पालिका गप्प

Published:

मुंबई / रमेश औताडे
पावसाळा सुरू होण्याअगोदर साफसफाईची (Premonsoon Drive) खोटी आकडेवारी देणारी पालिकेची यंत्रणा मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनगरातील तुडुंब नाल्यातील दुर्गंधीबाबत गप्प का, असा सवाल झोपडपट्टीतील नागरीक करत आहेत. मान्सूनचे आगमन आठ-दहा दिवसांवर आले असताना अद्याप पावसाळ्यापूर्वीची नालेसफाई झालेली नाही. त्यातच दुर्गंधीने नागरिक हैराण झाले आहेत.
नाल्यांच्या उग्र दुर्गंधीने लोक विविध आजारांना बळी पडत आहेत. झोपडपट्टीत लोक दाटीवाटीने राहत असल्याने आधीच कोंदट वातावरण असते. त्यातच नाल्यांची दुर्गंधी विविध आजारांना निमंत्रण देत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता अभियानानिमित्त हातात झाडू घेऊन फोटो काढले, पण नालेसफाईचे काय, असा सवाल नागरीक विचारत आहेत. उपनगरातील नाले व गटारे सांडपाण्याऐवजी कचरा व घाणीने तुडूंब भरले असून त्यामुळे परिसरात डासांची पैदास वाढली आहे.

Premonsoon Drive : आंबेडकर नगर, विलास गोपले नगरात स्वच्छताच नाही

मानखुर्द येथील डॉ. आंबेडकर नगर व विलास गोपले नगरच्या मधून वाहणाऱ्या नाल्याची कित्येक दिवसांपासून स्वच्छताच झालेली नाही. त्यामुळे या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून रोगराई वाढत आहे. एम पूर्व विभागांतर्गत प्रभाग क्रमांक १४२ मध्ये हे चित्र जवळपास सर्वच भागात दिसत आहे. झोपडपट्ट्यांतील गटारे, नाले व पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या वाहिण्या कचऱ्याने भरलेल्या आहेत. या कचऱ्याची दुर्गंधी तर येत आहे, पण याकडे उचभ्रू वस्तीत राहणारे लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. निवडणुका आल्या कि ही राजकीय मंडळी गल्लीबोळातून फिरतात, पण त्यांना या भागात कायमचे वास्तव्य करायचे नसते. त्यामुळे लोकप्रतिनिधी गांभीर्याने या प्रश्नाकडे पहात नाहीत.

हेही वाचा : केरळमध्ये बरसला मुसळधार पाऊस! महाराष्ट्रात कधी होणार दाखल?

Premonsoon Drive : कंत्राटदार गब्बर; जनता आजारी

महानगरपालिकेकडून नियमित साफसफाई होत असते. पण, पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईची कामे वर्षातून एकदाच करायची असतानादेखील त्याकडे कानाडोळा केला जातो. याचा त्रास येथील नागरिकांना भोगावा लागतो. लोकांनी नाल्यात कचरा टाकू नये, म्हणून नाल्यांना संरक्षक भिंत बांधली आहे. पण, वाढत्या लोकसंख्येमुळे संपूर्ण स्वच्छता करणे महापालीकेच्या यंत्रणेलाही अशक्य होत आहे. यात कंत्राटदार गब्बर होतायत आणि जनता आजारी पडत आहे. याकडे नागरिकांनी वारंवार पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, पण वेड पांघरून पेडगावला गेलेल्या महापालिकेला याकडे गांभीर्याने फायचेच नाही, अशी तक्रार येथील नागरिक करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img