21 C
New York

Mega Block : रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

Published:

रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉकमुंबईत मध्य रेल्वेने आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी २६ मे रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या असून काहींचे मार्ग वळवण्यात आले आहे. तसेच रेल्वेकडून पावसाळा पूर्वीचे कामेही सुरु करण्यात आली आहे. रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक (Mega Block) घेतला जाणार आहे. या काळात रेल्वेची विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणारी आणि सीएसएमटीकडे येणारी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल विद्याविहार, कांजुरमार्ग, नाहूर या स्थानकात थांबणार नाहीत

Mega Block हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत असणार आहे. सीएसएमटी – चुनाभट्टी / वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी – वांद्र,गोरेगाव अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल – कुर्लादरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील.

पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

Mega Block पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. यामुळे काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही सुटणार नाहीत.

Mega Block गर्डरच्या उबारणीचा परिणाम

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरिन लाइन्सदरम्यान वानखेडे पादचारी पुलाच्या मुख्य गर्डरची उभारणीसाठी शनिवारी रात्री 1.10 ते पहाटे 4.10 वाजेपर्यंत तीन तासांचा ब्लॉक असल्याने अनेक लोकल अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. रात्री 11.49 ची विरार – चर्चगेट, रात्री 12.05ची विरार – चर्चगेट, रात्री 12.30 ची बोरिवली – चर्चगेट, रात्री 12.10 ची बोरिवली – चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रलपर्यंत तर पहाटे 4.15 ची विरार आणि 4.18 ची बोरिवली मुंबई सेंट्रलवरून सुटेल. रात्री 11.30 ची विरार – चर्चगेट शेवटची लोकल असेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img