21 C
New York

Janhavi Kapoor: जान्हवीचं ‘त्या’ मुद्द्यांवर भाष्य! नेटकरी झाले थक्क!

Published:

३१ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘मिस्टर अँड मिसेज माही’ चित्रपटासाठी सध्या जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच त्यानिमित्ताने ती मुलाखती देत आहे. एका मुलाखतीत तिने महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व दलित समाजाबद्दल मत मांडलं. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यामुळे जान्हवी प्रचंड चर्चेत आली आहे.

जान्हवी कपूर नेमकं काय म्हणाली?
‘द लल्लनटॉप’ ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूर म्हणाली, “मला वाटतं की महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील चर्चा पाहणं खूप रंजक असेल.” त्यावर मुलाखतकाराने विचारलं की पुणे कराराच्या आधी त्यांच्यात काय बोलणं झालं होतं? त्यावर जान्हवी म्हणाली, “त्यांच्यातील एक चर्चासत्र ज्यात ते बोलतील की ते कोणत्या गोष्टीबरोबर आहेत आणि कशाप्रकारे आंबेडकरांचे व गांधींचे विचार एकाच विषयावर बदलत राहिले, त्यांनी एकमेकांवर आपला कसा प्रभाव पडला. या दोघांनी कशी मदत केली…खरं तर त्यांनी आपल्या समाजाला प्रचंड मदत केली आहे, त्यामुळे त्यांना एकमेकांबद्दल काय वाटतं त्यापेक्षा अशा मुद्द्यांवर त्या दोघांना ऐकणं खूप रंजक असेल, असं मला वाटतं.”

ट्रोलिंगनंतर पहिल्यांदाच अभिनेत्री आली समोर; फ्लॉन्ट केला बेबी बम्प!

मुलाखतकार म्हणाला, गांधीजींचा आणि आंबेडकरांचा दलित समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता. त्यामुळे आजही या विषयावर राज्यशास्त्राच्या वर्गात खूपच चर्चा होतात.दोघांचे विचार खासकरून दलित व अस्पृश्यता याबद्दल खूप वेगळे होते. यावर जान्हवी कपूर म्हणाली, “होय, त्यांची मतं खूपच वेगळी होती आणि मला वाटतं की आंबेडकर सुरुवातीपासूनच अतिशय स्पष्ट आणि ठाम वक्ते होते, पण गांधींचे विचार हळूहळू विकसित झाले.” जातीयवाद समस्यांवर बोलताना जान्हवी म्हणाली,”आपल्या समाजात जी जातीयवादाची समस्या आहे, त्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून माहिती मिळवणं आणि ती जगणं यात खूप फरक आहे.”


दरम्यान, जान्हवी कपूरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. जेव्हा जान्हवीने जातीयवाद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यातील चर्चा पाहायला आवडेल असं म्हटलंय, त्यामुळे नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत. मुलाखतकारही म्हणतो की जान्हवी या विषयावर बोलेल, असं अपेक्षित नसल्याने त्याला आश्चर्य वाटलं. जान्हवीला आता सोशल मीडियावर ‘ब्यूटी विथ ब्रेन’ म्हटलं जात आहे. चाहत्यांकडून आणि सहकलाकारांकडून जान्हवीचं कौतुक केलं जातंय.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img