23.1 C
New York

IPL 2024 Final : संजू सॅमसन पराभवास कारणीभूत -सुभाष हरचेकर

Published:


सतराव्या आयपीएलचा अंतिम सामना (IPL 2024 Final) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Night Riders) आणि सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) संघांमध्ये रविवारी रात्री प्रकाशझोतात चेन्नईमधील एम ए चिंदबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
शुक्रवारी प्लेऑफमधील क्वालीफायर क्रमांक दोनच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाने राजस्थान रॉयल्स संघाचा ३६ धावानी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. सनरायजर्स हैदराबाद संघाला क्वालीफायर क्रमांक एकच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स कडून पराभव पत्करावा लागला होता. त्या दारूण पराभवाचे शल्य बाजूला सारत कर्णधार पॅट कमिन्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभूत करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचे आव्हान परतवून लावले.

IPL 2024 Final : माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयशी

वास्तविक हा महत्वपूर्ण सामना जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी राजस्थान रॉयल्स संघाकडे चालून आली होती. हैदराबाद संघाला नऊ बाद १७५ धावांवर रोखण्यात राजस्थान रॉयल्स संघाच्या गोलंदाजानी यश मिळवले. वीस षटकांत हे लक्ष्य आवाक्याबाहेरचे नव्हते. पण, राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख फलंदाजाना संघाला तारूण नेण्यात अपयश आले. मी तर कर्णधार संजू सॅमसनला पराभवास जबाबदार धरेन. विजयाचे लक्ष्य गाठण्यासाठी सलामीच्या फलंदाजांकडूच चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते. पण, टॉम कोहलर कॅडमोर चोवीस धावांची सलामी देऊन बाद झाला. यशस्वी जयस्वाल एका बाजूने चांगली कामगिरी करत असताना राजस्थान रॉयल्स संघ विजयी होईल, अशी शक्यता वाटत होती. पण, जयस्वालला इम्‍पॅक्ट गोलंदाज शाहबाज अहमदने बाद केले.

हेही वाचा : 10 वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली

IPL 2024 Final : बटलरच्या अनुपस्थितीत सॅमसनकडून अपेक्षा होत्या

कर्णधार संजू सॅमसनने त्यावेळी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी होती की, जोस बटलरच्या अनुपस्थितीत संघाची धुरा कर्णधार म्हणून त्याच्या खांद्यावर आहे. पण, राजस्थान रॉयल्सच्या कर्णधाराने उतावीळपणा केला आणि त्याने आपली विकेट फेकली. एलीमिनेटरच्या सामन्यातही संजू सॅमसनने अशाच प्रकारे आपली विकेट दिली होती. तो बाद झाल्यामुळे इतर फलंदाजांवर दडपण आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. तशातच षटकामागे धावांचा वेगही वाढत गेला आणि यामुळे यंदा फॉर्ममध्ये असलेल्या रियान पराग, शिमरन हेटमायर, रोवमन पॉवेलला आपला नैसर्गिक खेळ सोडून विकेट बहाल कराव्या लागल्या. कर्णधार संजू सॅमसनने संयम राखत एकेरी, दुहेरी धावांवर भर देऊन आणखी पडझड होऊ दिली नसती तर कदाचीत सामन्याचा निकाल राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला असता.
या सामन्यात संजू सॅमसनने यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केली नाही. त्याला ग्लोव्हजमध्ये चेंडू नीट पकडता येत नव्हता. एकदा तर यष्टीचीतची संधीही त्याने दवडली. क्षेत्ररक्षण स्विकारल्यावर संजू सॅमसनला आर अश्विनचा वापर योग्य रितीने करता आला नाही. राजस्थान रॉयल्सच्या पराभवाचे प्रमुख कारण संजू सॅमसन असेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img