24.7 C
New York

Pandurang Sakpal : शिवसेनेचे माजी विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ यांचे निधन

Published:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे आज शनिवारी (ता. 25 मे) निधन झाले. ते 61 वर्षांचे होते. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर पांडुरंग सकपाळ यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यामुळे इमान कायम राखणारे ते कट्टर शिवसैनिक होते, असे बोलले जाते. पांडुरंग सकपाळ यांची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी पाच सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने ठाकरे गटावर शोककळा पसरली आहे. (Pandurang Sakpal Passed Away Former head of Thackeray group South Mumbai)

Pandurang Sakpal उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही.

पांडुरंग सकपाळ यांचे 2023 मध्ये विभागप्रमुख पद काढून घेण्यात आले. ज्यानंतर त्यांनी राजकारणाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. पण त्यांच्या जाण्याने आता ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दुःख व्यक्त केले आहे. सकपाळ यांना राऊतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. मात्र, शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक असलेल्या पांडुरंग सकपाळ मात्र उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. ते पहिल्यापासूनच बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासून साथीदार म्हणून ओळखले जात होते. पण पक्षात फूट पडूनही त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली नाही. त्यांनी दक्षिण मुंबईत भगवा झेंडा फडकवत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

10 वीच्या निकालाची पतीक्षा संपली

Pandurang Sakpal राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षात फूट पडल्यानंतर आता पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येऊ लागल्यानंतर दक्षिण मुंबईतील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले. यावेळी सकपाळ यांच्याकडून त्यांच्याकडे असलेले पद काढून घेत, ती जबाबदारी संतोष शिंदे यांना देण्यात आली. ज्यानंतर त्यांनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण, खासदार अरविंद सावंत यांच्या दबावाच्या राजकारणामुळे पांडुरंग सकपाळ यांना विभागप्रमुख पदावरून काढण्यात आल्याची चर्चा तेव्हा रंगली. तब्बल 12 वर्षे दक्षिण मुंबईतील प्रभाग क्रमांक 12 च्या विभाग प्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी एकनिष्ठतेने पार पाडली. पण 2023 मध्ये उद्धव ठाकरे यांनी दक्षिण मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या तेव्हा त्यांच्याकडून हे पद काढून घेण्यात आले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img