16.7 C
New York

Rajkot Fire : राजकोटमध्ये गेम झोनमध्ये अग्नितांडव; 12 बालकांसह 24 जणांचा मृत्यू

Published:

गुजरातच्या राजकोट शहरात एका गेम झोनमध्ये लागलेल्या (Rajkot Fire) भीषण आगीत किमान 12 मुलांसह 24 जणांचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. सुट्ट्यांच्या हंगामामुळे मोठ्या संख्येने लहान मुलांसह पालक हजर होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.


आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. टीआरपी गेम झोनमधे उभारलेल्या मंडपात शनिवारी सायंकाळी आग लागली. बघता बघता आगीने उग्र रूप धारण केले आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे घटनास्थळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेली मुले आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

डोंबिवली स्फोटाच्या 45 तासांनंतरही शोधकार्य सुरूच


राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. पीएम मोदींनी एक्स वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “राजकोटमधील आगीच्या दुर्घटनेने अत्यंत दुःख झाले आहे. ज्यांनी आपले प्रियजन या दुर्घटनेत गमावले आहेत, मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत देण्याचे काम करत आहे.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img