21 C
New York

Lok Sabha election : मतदानाच्या टक्केवारीवरून संशय व्यक्त

Published:

लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha election) पाच टप्प्यांचे मतदान पार पडले आहे. तर सहाव्या टप्प्याचे मतदान आज पार पडले. परंतु पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीवरून बराच गोंधळ उडाला होता. पहिल्या टप्प्यापासून अंतिम आकडेवारीही उशीरा जाहीर करण्यात येत होते. काही आकडेवारी दोन-तीन दिवसांनी अंतिम जाहीर करण्यात आली होती. अंतिम आकडेवारीत मतदानाचा टक्का वाढलेला दाखविण्यात आला होता. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी, विरोधकांनी मतदानाच्या टक्केवारीवरून संशय व्यक्त केला होता. त्यावर शनिवारी भारत निवडणूक आयोगाने/strong> ( Election Commission India) एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करून वस्तूस्थिती सांगितली आहे.

निवडणूक आयोगाने पाच टप्प्यातील मतदानाची अंतिम आकडेवारी वेबसाइटवर जारी केली आहे. मतदानाच्या टक्केवारीवरून लोकांची दिशाभूल करणारी माहिती पसरविण्यात आली आहे. त्यातून चुकीचे नॅरेटिव्ह सेट केला आहे. मतदानाच्या टक्केवारीत कुठल्याच प्रकाराचा बदल होऊ शकत नाही. ते शक्यही नाही. अंतिम आकडेवारीबाबत एडीआर या संस्थेने सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल केली होती. मतदानाचा अंतिम आकडा हा नागरिकांसाठी सार्वजनिक करावा. तसेच मतदान केंद्रानुसार मतदानाचा आकडा (डाटा) हा सार्वजनिक करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांची होती. परंतु कोर्टाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने शनिवारी पाच टप्प्यातील मतदानाच्या टक्केवारीचे माहिती दिली आहे.

बुलढाण्यात पाणी टंचाईचं संकट

Lok Sabha election पारदर्शी कारभार, मतदानाच्या टक्केवारीत बदल होऊ शकत नाही

निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघानिहाय मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर केली आहे. त्यात झालेले मतदान आणि टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया ही पारदर्शक आहे. त्यात कुठलाही भेदभाव केला नाही. प्रत्येक उमेदवारांना मतदान केंद्रावरील मतदान झाल्याचा फॉर्म 17 सी दिला जात आहे. देशभरात 10 लाख 50 हजार मतदान केंद्र आहेत. त्यामुळे फॉर्म 17 सीमधील मतदानाचा आकडा कुठल्याच परिस्थितीत बदलू शकत नाही. त्याची माहिती उमेदवारांकडे आहे. उमेदवार आणि पोलिस एजंटला फॉर्म 17 सी मतदान केंद्रावर नेण्यास परवानगी आहे. त्यामुळे ते प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीतील मतांची पडताळणी घेऊन जात आहे. निवडणुकीनंतर लोकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाते. परंतु मतदानांतर कोणत्या परिस्थिती आकडेवारीत बदल होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टानेही याबाबत आदेश दिलेला आहे.

Lok Sabha election मतदानाचा अंतिम आकडेवारी

पहिला टप्पा – 66.14 टक्के
दुसरा टप्पा- 66.71 टक्के
तिसरा टप्पा : 65.68 टक्के
चौथा टप्पा : 69.16 टक्के
पाचवा टप्पा : 62.20 टक्के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img