23.1 C
New York

Education News : विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा हवी की नको?

Published:

सध्या इंग्रजी भाषा आपल्याला लिहिता येणे आणि त्यासोबतच ती बोलता येणे , Education News हे अत्यंत आवश्यक झाले आहे. पण लहानपणापासूनच अकरावी आणि बारावीमध्ये मराठी भाषेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना मात्र हे इंग्रजी भाषेतून शिक्षण घेणे कठीण होते. ण इंग्रजी न येणाऱ्या विद्यार्थ्यांना आता चिंता करण्याची करण्याची गरज नाही. कारण राज्याच्या नव्या अभ्यासक्रम आराखड्यातून इंग्रजीवरील सक्ती काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे आता 11 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची सक्ती नसणार, हे स्पष्ट झाले आहे. (English Language is not compulsory to 11th and 12 students)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये मातृभाषा आणि भारतीय भाषांना विशेष महत्त्वा देण्यात आले आहे. तर, महत्त्वाचे म्हणजे, परदेशी भाषा शिक्षणाचे पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावेत, अशी सूचना या आराखड्याच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दोन भारतीय भाषा, चार वैकल्पिक विषय आणि दोन अनिवार्य विषय असे एकूण आठ विषय निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. तर, दोन भाषांशिवाय एक अधिकची भाषा वैकल्पिक विषय म्हणून निवडायची संधी असेल, असे या आराखड्यात नमूद करण्यात आले आहे.

10 वीच्या निकालाची पतीक्षा संपली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नव्या आराखड्यात परदेशी भाषांमध्ये इंग्रजी भाषेचा समावेश केला आहे. आपल्या अभ्यासक्रमात त्यामुळे या भाषेचा समावेश करायचा की नाही, विद्यार्थ्यांवर हे पूर्णतः अवलंबून असणार आहे. ज्यामुळे सध्या आता अकरावी, बारावीला असलेले इंग्रजीचे बंधन काढून टाकण्यात आले आहे. आराखड्यात इंग्रजी भाषा अनिवार्य नसेल असे नमूद करण्यात आले आहे. राज्याचा अभ्यासक्रम आराखड्यात 11वी-12वी इयत्तांना इंग्रजी अनिवार्य नसेल. तर, वैकल्पिक भाषा निवडताना कला, विज्ञान, वाणिज्य अशा शाखांमधील विद्यार्थ्यांना साचेबद्ध बंधन नसेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना 26 भाषांमधून दोन विषय निवडावे लागतील.

Education News त्या 26 भाषा कोणत्या?

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या नव्या आराखड्यात 17 भारतीय भाषा आणि 09 परदेशी भाषांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती, उर्दू, कन्नड, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी, पाली, अर्धमागधी, प्राकृत, अवेस्ता पहालवी या मूळ 17 भाषांचा समावेश करण्यात आला आहे. तर इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, चायनीज, पर्शियन, अरेबिक या 09 परदेशी भाषांचा समावेश करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img