19.7 C
New York

Cannes Film Festival 2024: अभिमानास्पद क्षण! स्टँडिंग ओव्हेशन अन्..छाया कदम झाल्या भाऊक

Published:

Cannes Film Festival 2024: कानमध्ये कौतुकाचा वर्षाव पाहून छाया कदम झाल्या भावुक

Cannes Film Festival 2024: गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेलं नाव म्हणजे छाया कदम.(Chhaya Kadam) अभिनेत्री छाया कदम ह्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. खरं तर छाया यांच्या कामाचं मराठी तर होतंच पण हिंदी सिनेसृष्टीतही बेफाट कौतुक होतंय. इतकंच नव्हें तर आता ‘कान फिल्म फेस्टिव्हल २०२४’मध्येही त्यांच्या कामाची दाखल घेतली जातेय.

तरुणांना घायाळ करणाऱ्या ‘धकधक गर्ल’च सोज्वळ रूप

दिग्दर्शित पायल कपाडिया यांच्या ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ (All We Imagine as Light) या चित्रपटाचं नुकताच ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये स्क्रिनिंग झालं. ह्या चित्रपटातच छाया यांची महत्वाची भूमिका आहे. यासाठीच या चित्रपटानिमित्ताने छाया कदम यंदाच्या ‘कान फेस्टिव्हल’मध्ये झळकल्या. पहिल्या दिवशी छाया कदम यांनी अतिशय सुंदर असा लूक केलेला. अगदी आईची साडी, नथ, केसात गजरा आणि कपाळावर टिकली असा मराठमोळा लूक केलेला. तर दुसऱ्या दिवशी त्यांचा हटके लूक पाहायला मिळाला.

‘ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंग आधी रेड कार्पेटवर छाया कदम यांनी सर्व कलाकारांसह डान्स केला. मग चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर उपस्थितांनी स्टँडिंग ओव्हेशन (Standing Ovation) देऊन टाळ्यांचा गजरात केला. यावेळी छाया कदम भावुक झाल्या होत्या. नंतर छाया कदमी यांनी सर्वाना फ्लाईंग किस देऊन हात जोडून सर्वांचे आभार मानले. ह्या सगळ्यांनंतर दिग्दर्शिका पायल कपाडिया (Payal Kapadia) यांनी सर्वाना कौतुकाने मिठी मारली. छाया कदम यांच्या अभिमानस्पद क्षणाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. बाकी मराठी कलाकार छाया कदम यांचं भरभरून कौतुक करत आहेत.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ‘कान फिल्म फेस्टिव्हल’ (Cannes Film Festival 2024) या स्पर्धेत ३० वर्षांनंतर एखादा भारतीय चित्रपट शर्यतीत आहे. ऑल वी इमॅजिन ॲज लाइट’ (All We Imagine as Light या चित्रपटात छाया कदम व्यतिरिक्त दिव्या प्रभा, कनी कुसरुती, याच्या मुख्य भूमिका आहेत.

दरम्यान, छाया कदम यांच्या २ हिंदी चित्रपटांची इंडस्ट्रीत बरीच चर्चा आहे. दिग्दर्शित किरण राव (Kiran Rao) यांचा ‘लापता लेडीज'(Laapta Ladies) ह्या चित्रपटात छाया यांची मंजू माईची भूमिका आहे. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आहे. या चित्रपटातील छाया यांच्या डायलॉगचे व्हिडिओस सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत. याशिवाय छाया कदम दिग्दर्शित कुणाल खेमू यांच्या ‘मडगाव एक्सप्रेस’ (Madgoan Express) चित्रपटात सुद्धा बाजी मारली होती. या चित्रपटासाठी सुद्धा त्यांच्या कामाचं कौतुक केलं होत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img