23.1 C
New York

Anasuya Sengupta: कान्स पुरस्कार जिंकणारी ‘ही’ पहिली अभिनेत्री कोण?

Published:

‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ २०२४ (Cannes Film Festival 2024) भारतीय सिनेसृष्टीसाठी राहिला आहे. ७७ वा ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’मध्ये जवळपास ४८ वर्षांनंतर श्याम बेनेगल यांच्या ‘मंथन’ला स्पेशल स्क्रिनिंग मिळालं. या सोहळ्यात अनेक भारतीय सिनेसृष्टीतील कलाकार, एन्फ्लूएन्सर व उद्योजक उपस्थित होते. अनेक श्रेणींमध्ये भारतीय चित्रपट आणि कलाकारांना नामांकन मिळालं होतं. अशातच आता एका भारतीय अभिनेत्रीने ‘कान’ मध्ये पुरस्कार मिळवला आहे. अनसूया सेनगुप्ता (Anasuya Sengupta) असं या अभिनेत्रीचं नाव आहे. ही अभिनेत्री पश्चिम बंगालमधील कोलकाताची आहे. तिने ‘द शेमलेस’मधील तिच्या अभिनयासाठी अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंटमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला.

ऐश्वर्याच्या दुखापतीचे खरे कारण आले समोर..

बल्गेरियन चित्रपट निर्माते कॉन्स्टँटिन बोजानोव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखनाची धुरी सांभाळी आहे. अनसूयाने रेणुका नावाची भूमिका साकारली होती. तिचं पात्र एका पोलीस अधिकाऱ्याची हत्या केल्यानंतर दिल्लीच्या वेश्यागृहातून पळून जाते. या चित्रपटात ओमरा शेट्टी ही देखील महत्वाच्या भूमिकेत आहे. हा पुरस्कार जिंकणारी अनसूया ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. अनसूया मूळची कोलकाताची असली तरी तिने मुंबईत प्रॉडक्शन डिझायनर म्हणून काम केलं आहे. ती सध्या गोव्यात राहते. नेटफ्लिक्स शो ‘मसाबा मसाबा’मध्ये तिने डिझाइन केले होते. याआधी ‘द कोलकाता’ला दिलेल्या मुलाखतीत अनसूया म्हणाली होती, “कान्समध्ये आमच्या चित्रपटाला नॉमिनेशन मिळाल्याचं कळाल्यावर मी आनंदाने खुर्चीवरून उडी मारली होती!”

जगभरातील समलैंगिक समुदायाच्या शौर्याला अनसूयाने हा पुरस्कार समर्पित केला आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भाषणात ती म्हणाली, “सर्वांच्या समानतेसाठी लढणासाठी तुम्ही समलिंगी असण्याची गरज नाही. आपण फक्त सभ्य माणूस असायला हवं.”

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img