8.7 C
New York

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट

Published:

पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात (Pune Porsche Accident) मोठा ट्विस्ट आला आहे. आज पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक केली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडिल विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर पोलिसांनी आजोबा सुरेंद्र अगरवालच्याही मुसक्या आवळल्या आहेत. कार ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शु्क्रवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.

कल्याणीनगर येथील अपघाताचे प्रकरण देशभरात गाजत आहे. या प्रकरणात रोजच धक्कादायक खुलासे होत आहेत. काल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत अनेक खुलासे केले. या प्रकरणात सुरुवातीला येरवडा पोलिसांकडून दिरंगाई झाल्याचेही मान्य केले. त्यानंतर लगेचच दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या घडामोडीनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर कार चालकाला धमकी देऊन जबाब देण्याबाबत दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याआधी गुरुवारी सुरेंद्र अग्रवालची चौकशी झाली होती. या चौकशीत अल्पवयीन मुलाला चावी दिल्याची कबुली त्यांनी दिली होती. नातू अल्पवयीन असल्याने त्याच्यावर अल्पवयीन म्हणूनच खटला चालवावा अशी मागणीही त्यांनी केली होती.

भाविकांनो काळजी घ्या, दर्शनी भागावर धोकादायक इमारत

Pune Porsche Accident येरवड्यातील दोन पोलीस निलंबित

येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerwada Police) दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. हिट अँड रन गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई आणि अपघाताची माहिती वेळेत वरिष्ठांना दिली नाही असा ठपका ठेवत दोघांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. तर आता तपासी अधिकारीही बदलण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे या करीत होत्या. पोलिस आयुक्तांनी त्यांच्याकडून तपास काढून घेतला असून, तो आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आता या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे हे करीत आहेत.

19 मे च्या पहाटे भरधाव पोर्शे कार चालवून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने दोन जणांचा जीव घेतला होता. या प्रकरणात त्याला सुरुवातील अवघ्या एका दिवसात जामीन मिळाला होता मात्र त्यानंतर त्याचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बाल निरीक्षणगृहात पाठवण्यात आले आहे. तर दुसरीकडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img