3.8 C
New York

SSC Result : 10 वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली

Published:

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) इयत्ता 10 वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी. बोर्डाकडून (MSBSHSE) एसएससी (SSC) 10 वी परीक्षेचा निकाल (SSC Result) 27 मे रोजी जाहीर करण्यात येार आहे. विद्यार्थ्यांना निकाल दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती ते त्यांचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर पाहू शकतील. याबाबतची माहिती मंडळाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली. दरम्यान दहावीचा निकाल 27 मेच्या आधी लागेल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती.

SSC Result दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात

विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा मेच्या चाैथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल.

मुंबईत पालिकेकडून पाणीकपात जाहीर

बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली होती. दरम्यान, मंडळाने निकालाची तारीख जाहीर करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. दहावीचा निकाल 27 मे या दिवशी दुपारी एक वाजता निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.तसेच एसएमएस आणि डिजीलॉकरच्या माध्यमातूनदेखील तुम्ही हा निकाल पाहू शकता. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीची परीक्षा 1 मार्च ते 6 मार्च दरम्यान झाली. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

SSC Result निकाल कोणत्या वेबसाईटरवर पाहणार?

दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल mahresult.nic या वेबसाईटवर उपलब्ध होईल. याशिवाय आणखी काही वेबसाईटवर निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. डिजीलॉकरद्वारे देखील निकाल पाहता येऊ शकतो. तुम्ही या वेबसाईटना भेट देऊ शकता. काही अडचण आल्यास डिजीलॉकरचा भविष्यात फायदा होऊ शकतो. सीबीएसईनं काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर केला होता,गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यात 2023-24 या शैक्षणिक वर्षात जवळपास 16 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचं लक्ष दहावीच्या निकाल कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img