3.5 C
New York

Monsoon : मुंबईत कधी दाखल होणार मान्सून ?

Published:

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अवकाळी पाऊस सध्या अधूनमधून बरसतो आहे. (Monsoon)मात्र, मुंबईतही अद्यापही पावसाचा मागमूस नाही. उकाड्यानं त्रस्त झालेले मुंबईकर आतुरतेनं पावसाची वाट बघत आहेत. त्यांच्यासाठी भारतीय हवामान विभागानं महत्त्वाची बातमी आणली आहे. यंदा मोसमी पाऊस मुंबईत वेळेत दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.भारतीय हवामान खात्याच्या (IMD) अधिकाऱ्याच्या हवाल्यानं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो सिटीमध्ये १० जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात होईल. नैर्ऋत्य मोसमी वारे ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये पावसाचा जोर वाढल्यानंतर ३१ मे रोजी (चार दिवसांचा फरक गृहित धरून) मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस आणि दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. ३१ मेच्या आसपास केरळमध्ये मान्सूनदाखल होण्याची शक्यता आहे. पूर्व आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर ठीकठाक राहील. मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पाऊस तुरळक आणि वायव्य भारतात सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमध्ये 31 मे पर्यंत मान्सून पोहोचेल. त्यानंतर मुंबईत पोहोचण्यासाठी 10 ते 11 जूनपर्यंत वाट पाहावी लागेल, असं त्यांनी म्हटलं.

अभिनेता गोविंदाने पंतप्रधान मोदींना भेटून भारावला

Monsoon मान्सून मुंबईत कधी दाखल होणार?

मुंबईत मान्सूनचं आगमन जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता असली तरी हवामान अभ्यासकांनी मान्सूनपूर्व पाऊस मुंबईसह राज्यातील विविध भागात हजेरी लावू शकतो असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईत मान्सूनच्या प्रवेशासंदर्भात अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेलं नाही. मात्र, केरळमध्ये मान्सूनचं आगमन आणि अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात अपेक्षित चक्रीवादळं नसल्यामुळं मुंबईत मान्सूनच्या पावसाला वेळेत सुरुवात होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अंदमानात दाखल झाला असून १० ते ११ जून दरम्यान तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे.

Monsoon मुंबईत सध्या घामाच्या धारांची बरसात

मुंबईत सध्या प्रचंड उष्णता आहे. घरात असो की बाहेर, मुंबईकर घामाच्या धारांनी चिंब होत आहेत. रात्रीच्या वेळेसही प्रचंड उकाडा जाणवत आहे. गृहिणींना स्वयंपाकघरात उभं राहणं कठीण झालं आहे. उकाड्यामुळं त्रस्त असलेले काही मुंबईकर ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा असूनही कार्यालयात जाणं पसंत करत आहेत. लवकरात लवकर पाऊस यावा अशी इच्छा सर्वच जण व्यक्त करत आहेत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img