5.2 C
New York

Pune Car Accident : विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Published:

कल्याणीनगर अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील आणि प्रसिद्ध (Pune Car Accident) बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालला (Vishal Agrawal) न्यायालायाने 14 दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी (दि.22) रोजी पुणे सत्र न्यायालयाने विशाल अग्रवालला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपत असल्याने पोलिसांनी अग्रवालला न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी चौकशीसाठी केलेली सात दिवसांच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे सांगत विशाल अग्रवालची रवाननगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. मात्र, पोलिसांना इतके दिवस तपासासाठी का लागतात? असा युक्तिवाद अग्रवालच्या वकिलांनी केल्यानंतर न्यायालयाने अग्रवालला पुढील तपासासाठी 14 दिवस पोलीस कोठडी नाकारत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याशिवाय न्यायालयाने दोन पब मालक आणि इतर तिघांनाही 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Pune Kalyani Nagar Car Accident Builder Vishal Agrawal Set Judicial Custody For 14 Days )

Pune Car Accident कोर्टात नेमकं काय घडलं?

मागील वेळी विशाल अग्रवालला न्यायालयात नेत असताना काही जणांना त्याच्यावर शाईफेक केली होती. त्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे आज (दि.24) अग्रवालला न्यायालयाच्या मागील गेटने नेण्यात आले. त्यानंतर सुनावणी पोलिसांनी अल्पवयीन तरुणाचा मोबाईल आत्ताच मिळाला आहे. तसेच विशाल अग्रवाल याची देखील पुन्हा चौकशी करायची करायची आहे. काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे आणखी सात दिवसांची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. याशिवाय पुरावे नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला याचा देखील तपास करायचा आहे. त्यामुळे चौकशीसाठी आणखी सात दिवासांची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे पुणे पोलिसांनी कोर्टात सांगितले. मात्र, ही मागणी फेटाळत कोर्टाने विशाल अग्रवालची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली आहे. न्यायालायाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवालचा जामीनाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नगरमधील गावगाड्याची तहान भागवायला 333 टँकर

Pune Car Accident अग्रवालच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

पुणे पोलिसांनी वाडीव सात दिवासांच्या पोलीस कोठडीला विशाल अग्रवालच्या वकिलांनी जोरदार विरोध केला. त्यांनी न्यायालयात सांगितले की, 420 कलम लावणे किंवा इतर कारणे, टॅक्स न भरणे हे काही पोलीस कोठडी वाढवण्याचे कारण होऊ शकत नाही. घरच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर आधीच जप्त केला आहे. पहिल्यावेळी पोलीस कोठडी मागितली होती. ⁠तसेच दोन्ही पबचे सीसीटीव्ही डीव्हीआर पोलिसांकडे आहे. त्यामुळे विशाल अग्रवालची पोलीस कोठडी वाढवण्याची आवश्यकता नसल्याचे सांगितले.

बील भरण्याचे 47 हजार कुठून आले मुलाकडे, यासाठी कोठडीची गरज नाही. ⁠सीसीटीव्ही फॅारेन्सिक टेस्ट करायची असेल पोलिसांना तर त्यासाठी पोलीस कोठडी कशाला हवी, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला. कोझी क्लबचा रेंट ॲग्रिमेंट रजिस्टर आहे. ते ॲानलाईन मिळू शकते.पीडित मुलाच्या मित्रांची चौकशी करायची असेल. त्यांच्या बरोबर कोण होते याची माहिती घ्यायची असेल. तर त्यात मुलाचे वडील आणि इतर आरोपी यांचा काय संबंध आहे.⁠ या सर्वांसाठी पोलीस कोठडी आवश्यक नाही, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांकडून करण्यात आलाय.

कल्याणी नगर परिसरात अलिशान गाडीने दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन वेदांत अग्रवालचा जामीन रद्द करण्यात आल्यानंतर त्याची रवानगी 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. तर, त्याचे वडील विशाल अग्रवालला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यादरम्यान विशाल अग्रवालची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी विशाल अग्रवालने अल्पवयीन मुलगा वेदांतला गाडी देऊन चूक केल्याची कबुली दिल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune Car Accident जुन्या प्रकरणात आजोबांचीही चौकशी

एका जुन्या प्रकरणात अल्पवयीन आरोपीच्या आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना काल (दि.23) चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणण्यात आले होते. हिट अँड रन प्रकरणाच्या तपासादरम्यान अग्रवाल कुटुंबाचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे गुन्हे शाखेने वेदांतचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना चौकशीसाठी बोलावल्याचे बोलले जाते.

2007 आणि 2008 मध्ये भावाशी संपत्तीवरून वाद असल्याने सुरेंद्र अग्रवाल यांनी बँकाकला जाऊन छोटा राजनची भेट घेतली होती आणि त्यानंतर शिवसेनेचे नेते अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी छोटा राजनला दिली होती. या प्रकरणात त्यांच्यावर एफआयआर देखील दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी या प्रकरणात मकोकाच्या अंतर्गत एफआयआर दाखल न करता विविध कलमांतर्गत एफआयआर दाखल केल्याने पोलिसांच्या कामकाजावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मात्र आता पुन्हा एकदा या प्रकरणात सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img