मुंबई
राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आता सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे.भीषण पाणटंचाई आहे त्यामुळे शेतकरी असो की सामान्य जनता त्रस्त आहे. अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाही. राज्य सरकारने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, दुष्काळी भागात चारा छावण्या, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने करावी. टँकर राज्यात सुरु असेल तरी राज्यातील पाणीसाठा इतका कमी आहे की येणाऱ्या दिवसात टँकर देण्यासाठी पाणी उपलब्ध असेल का हा प्रश्न आहेत.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले आता राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे. राज्य सरकारने तातडीने पाणी व चाऱ्याची सोय करण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.