16.8 C
New York

Education News : तिसरी ते बारावीसाठीचा अभ्यासक्रम बदलणार

Published:

अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना आता अभिजात भाषांबरोबरच परदेशी भाषा शिकण्याची संधी मिळणार (Education News) आहे. त्यासोबतच सध्या अनिवार्य असलेला इंग्रजी विषय अनिवार्य नसेल, असा उल्लेख राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात करण्यात आला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा गुरुवारी जाहीर करण्यात आला आहे. ३ जूनपर्यंत या मसुद्यावर सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत.राज्य अभ्यासक्रम आराखडय़ाच्या मसुद्यावर सर्व समाजघटक, शिक्षक, पालक आणि शिक्षणतज्ञ, शैक्षणिक प्रशासन आपले अभिप्राय पाठवू शकतात. त्यासाठी 3 जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अभिप्राय नोंदविताना आपले नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल, पत्ता, कार्यालय, जिल्हा आदी तपशील देणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना मातृभाषा आणि भारतीय भाषांबरोबरच परदेशी भाषा शिक्षणाचे पर्याय उपलब्ध करून देण्यात यावेत अशी सूचना या मसुद्यात करण्यात आली आहे. अकरावी आणि बारावीला किमान दोन भाषांचा अभ्यास करताना दोनपैकी १ भारतीय भाषा असेल. यामध्ये संस्कृत, तमिळ या अभिजात भाषांबरोबरच हिंदी, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिशा, पाली, पर्शियन, प्राकृत, अर्धमागधी या भाषा याबरोबरच फ्रेंच, जर्मन, जपानी, कोरियन या परदेशी भाषा शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल. अकरावी आणि बारावी अभ्यासक्रमासाठी ८ विषय असणार आहेत.

ब्रिटनमध्ये कशा होतात निवडणुका?

Education News तीन भाषांतील पर्याय म्हणून संस्कृत

तीन भाषा शिकणे प्रत्येक विद्यार्थ्यांला तीन भाषा येणे आणि त्यासाठी त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याचे ध्येय आहे. बहुभाषिकतेमुळे विद्यार्थ्याला संवादाचे अनेक पैलू, सांस्कृतिक समृद्धता आणि बहुविध बोधात्मक क्षमतांचा विकास असे अनेक फायदे होतात. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात तीन भाषा शिकतील.

Education News इंग्रजीची सक्ती नसणार

जगभरात वापरात असलेल्या इंग्रजीचे अभ्यासक्रमातील बंधन शिथिल करण्यात येणार आहे. पहिली ते १२ वी पर्यंत सध्या इंग्रजीचे शिक्षण अविनार्य आहे. परंतु ११वी आणि १२वीमध्ये यापुढे इंग्रजीची सक्ती नसेल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img